घ्या पुरावा! भारताने पाडलेल्या पाक विमानाचे अवशेष सापडले
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा सातत्याने टराटरा फाटत आहे. भारताने आमचं लढाऊ विमान पाडलं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष अखेर सापडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या विमानाचे अवशेष सापडले. या विमानाला भारतीय वायूसेनेच्या मिग 21 विमानाने हवेतच टिपलं होतं. भारत सरकारनेही भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी विमान खाली पाडल्याचं म्हटलं होतं. मात्र पाकिस्तान सातत्याने ते […]
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा सातत्याने टराटरा फाटत आहे. भारताने आमचं लढाऊ विमान पाडलं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष अखेर सापडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या विमानाचे अवशेष सापडले. या विमानाला भारतीय वायूसेनेच्या मिग 21 विमानाने हवेतच टिपलं होतं. भारत सरकारनेही भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी विमान खाली पाडल्याचं म्हटलं होतं. मात्र पाकिस्तान सातत्याने ते नाकारत होतं. अखेर या विमानाच्या अवशेषाचे फोटो सापडले आहेत.
दरम्यान पाकिस्तान ज्या मलब्याला भारताच्या विमानाचे तुकडे संबोधत आहे, ते तुकडे GE F110 इंजिन आहे. ते F16 विमानाचे आहेत. हेच विमान भारताने पाडलं. त्यामुळे पाकिस्तानच्या खोटेपणा दिवसेंदिवस उघडा पडत आहे.
Same picture circulating on social media claim this is an Indian MiG fighter, however multiple IAF sources confirm this is the wreckage of Pakistani F16 downed yesterday https://t.co/C7t5lYtP51
— ANI (@ANI) February 28, 2019
तीन विमानं पळवून लावली
जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. भारतीय हद्दीत पाकिस्तानची तीन विमाने घुसल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या
भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं, तर दोन्ही देशांच्या वायूसेनेत संघर्ष सुरु
पाकिस्तान बेपत्ता पायलटच्या केसालाही धक्का लावू शकत नाही
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी इंधन नाही, म्हणे भारताचा बदला घेणार
पाकचं विमान दिसताच पाडा, युद्धासाठी तयार राहा, भारतीय वायूसेनेला आदेश