जयपूर जेलमध्ये पाकिस्तानी कैद्याची हत्या

जयपूर: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा गोळीबार होऊन आणखी 5 जवान शहीद झाले. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला होता. वाचा: राजनाथ सिंह TV9 EXCLUSIVE: निर्णायक लढाईची वेळ आली! […]

जयपूर जेलमध्ये पाकिस्तानी कैद्याची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

जयपूर: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा गोळीबार होऊन आणखी 5 जवान शहीद झाले. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला होता.

वाचा: राजनाथ सिंह TV9 EXCLUSIVE: निर्णायक लढाईची वेळ आली!

या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घ्या अशीच मागणी देशभरातून होत आहे. त्याचाच भाग म्हणून देशाच्या विविध जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदीही आक्रमक झाले आहेत. राजस्थानातील जयपूर जेलमध्ये भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केली. शाकीर उल्हा असं या पाकिस्तानी कैद्याचं नाव आहे.

या घटनेची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. मात्र पाकिस्तानी कैद्याच्या हत्येनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

बिकानेरमध्ये अल्टिमेटम

दरम्यान, राजस्थानातील बिकानेरमध्ये पाकिस्तानी नागरिकांना इशारा देण्यात आला होता. बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी तिथे राहणाऱ्या किंवा पर्यटनासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात शहर सोड्याचा इशारा दिला होता. मात्र त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

पुलवामा हल्ला :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात बुलडाण्याच्या दोन वीरांनाही वीरमरण आलं.

संबंधित बातम्या 

“आणखी एका मुलाला सैन्यात पाठवेन, पण पाकला धडा शिकवा” 

महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा सलाम, निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला   

राजनाथ सिंह TV9 EXCLUSIVE: निर्णायक लढाईची वेळ आली!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.