पालघरमध्ये सतत भूकंप का येतो? ‘हे’ यंत्र शोध लावणार!

पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात महिनाभरापासून भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-3 मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच इतके सलग भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे पाहणीसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दिल्ली आणि मुंबई येथील तज्ज्ञांचे पथक पालघर जिल्ह्यात दाखल झालं. भूगर्भतज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने बुधवारी धुंदलवाडी येथील […]

पालघरमध्ये सतत भूकंप का येतो? 'हे' यंत्र शोध लावणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात महिनाभरापासून भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-3 मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच इतके सलग भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे पाहणीसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दिल्ली आणि मुंबई येथील तज्ज्ञांचे पथक पालघर जिल्ह्यात दाखल झालं. भूगर्भतज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने बुधवारी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल इथे प्राथमिक स्वरुपात 3 महिन्यांसाठी भूकंपमापन यंत्र बसवलं आहे. मात्र भूकंपाचे सत्र कायम राहिल्यास कायमस्वरूपी यंत्र बसविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

भूकंपाची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी सीसमोमीटर हे भूकंपमापन यंत्र धुंदलवाडी परिसरामध्ये वेदांत हॉस्पिटल परिसरात बसवण्यात आलं आहे. दीड बाय दीडचा खड्डा खोदून त्या ठिकाणी पीसीसी माल टाकून त्यावर भूकंप यंत्र बसविण्यात आले. भूकंप मापन यंत्र 24 तास कार्यान्वित राहण्यासाठी कायमस्वरूपी वीज, संगणक आणि इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक असल्याने, वेदांत हॉस्पिटल इथे हे यंत्र बसवण्यात आलं. सीसमोमीटर लावलेल्या परिसरात वाहने आणि व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून डहाणू, धुंदलवाडी भागात सलग भूकंपाचे 2.7 ते 3.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवत आहेत. या भागात एकूण 8 धक्के बसल्याच्या नोंदी आहेत. याशिवाय या संपूर्ण परिसरात अनेक सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के वारंवार बसतच आहेत. त्याअनुषंगाने इथे सीसमोमीटर बसविण्यात आले आहे.

या भागात 25 डिसेंबर 2017 आणि जव्हार तालुक्यात वाळवंडा भागामध्ये 2 जानेवारी 2018 रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यानंतर, त्याठिकाणी भूकंप मापन यंत्र बसवण्यात आले होते. त्यानंतर डहाणू भागात अचानक सुरु झालेली भूगर्भातील हालचाल ही रहिवाशांसाठी चिंतेची बाब होती.  सध्या बसणाऱ्या धक्क्यांचा केंद्रिबदू डहाणू शहरापासून सुमारे सात किलोमीटरवर आहे की 10 किलोमीटरवर आहे हे यंत्र बसविल्यानंतर समजणार आहे. त्याव्यतिरिक्त भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे डहाणू परिसरामध्ये भूकंपाच्या धक्क्याची खरी माहिती समोर येणार आहे. तसेच दैनंदिन बसणाऱ्या भूकंपाच्या नोंदी सीसमोमीटरच्या आधारे नोंदल्या जाणार असून त्यांचा अभ्यास केला जाणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.