IND vs SA Team India : आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो पांड्या, या खेळाडूला मिळणार विश्रांती

रिपोर्टनुसार, या मालिकेत रोहित शर्माशिवाय केएल राहुल, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

IND vs SA Team India : आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो पांड्या, या खेळाडूला मिळणार विश्रांती
आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो पांड्याImage Credit source: aaj tak
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 9:05 PM

मुंबई : भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (IND vs SA) टी 20 मालिका खेळायची आहे. त्यासाठी लवकरच संघ जाहीर केला जाणार आहे. या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत कोण बनणार टीम इंडियाचा कर्णधार, याची आता चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल (IPL 2022) संपल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA) पाच सामन्यांसाठी टी 20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार असून यामध्ये अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत संघाची धुरा कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत शिखर धवन किंवा हार्दिक पांड्यापैकी कोणीही भारताचे नेतृत्व करू शकतात.

विश्रांती का देणार?

रिपोर्टनुसार, या मालिकेत रोहित शर्माशिवाय केएल राहुल, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती दिली जाऊ शकते. जो सतत क्रिकेट खेळत आहे आणि यानंतर भारताला इंग्लंडचा महत्वाचा दौरा करायचा आहे. त्यामुळे खेळाडूंनाही विश्रांती देणे गरजेचं आहे. 22 मे रोजी टी 20 मालिकेसाठी संघ निवडला जाऊ शकतो. या दिवशी आयपीएलचे लीग सामने संपत आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माही मोकळा असेल, येथे निवडकर्ते संघ निवडतील.

हे सुद्धा वाचा

तीन-चार आठवड्यांची विश्रांती

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सर्व वरिष्ठ खेळाडूंचा तीन-चार आठवड्यांची विश्रांती दिली जाईल जेणेकरून ते थेट इंग्लंड दौऱ्यात सहभागी होऊ शकतील. रोहित, विराट, केएल, ऋषभ, बुमराह थेट इंग्लंडमध्येच संघात सामील होतील. कर्णधारपदाचा विचर करता निवडकर्त्यांसमोर दोन मोठे पर्याय आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.