बॉक्स ऑफिसवर ‘पानिपत’चं पानिपत, ‘पती पत्नी और वोह’ची दुप्पट कमाई
'पानिपत'शी (20.27 कोटी) तुलना करता पहिल्या चार दिवसात 'पती पत्नी और वोह'ची कमाई (41.64 कोटी) दुपटीहून जास्त आहे.
मुंबई : संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सॅनन यांची मुख्य भूमिका असलेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी काहीशी निराशाजनक आहे. त्याउलट कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या ‘पती, पत्नी और वोह’ चित्रपटाने ‘पानिपत’च्या दुप्पट गल्ला (Panipat Vs Pati Patni Aur Woh) जमवला.
पहिल्या चार दिवसांत ‘पानिपत’ चित्रपटाने भारतात 20.27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाला केवळ 4.12 कोटी रुपये जमवता आले होते. शनिवारचे 5.78 कोटी आणि रविवारचे 7.78 कोटी मिळून वीकेंडला या सिनेमाने जेमतेम 18 कोटी जमवले. सोमवारचा दिवस फारसा उत्साहवर्धक नसल्याने ‘पानिपत’ने कसाबसा 20 कोटींचा आकडा पार केला.
#Panipat continues to struggle… #Mumbai circuit – which was performing best – declines considerably on Day 4… North and East sectors remain poor… Fri 4.12 cr, Sat 5.78 cr, Sun 7.78 cr, Mon 2.59 cr. Total: ₹ 20.27 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 10, 2019
पानिपत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सदाशिवराव भाऊंच्या व्यक्तिरेखेत अर्जुन कपूरला पाहून चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती. मात्र आशुतोष गोवारीकरांचा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये हातखंडा असल्याने प्रेक्षकांना सिनेमाकडून अपेक्षा कायम होत्या. समीक्षकांनी ‘पानिपत’ला भरभरुन स्टार्स दिल्यामुळे गर्दी जमण्याची शक्यता वाटत होती, परंतु ती आशाही फोल ठरल्याचं दिसत आहे.
उन्होंने मेरी सूरत बदली, मेरा मन नहीं, दीपिकाच्या ‘छपाक’चा काटा आणणारा ट्रेलर
पानिपत चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात मुंबईत चांगली कामगिरी केली होती, मात्र चौथ्या दिवशी त्यामध्ये चांगलीच घसरण झाली. उत्तर आणि पूर्व विभागात ‘पानिपत’ला फारशी चमक दाखवता आली नव्हती. आता पहिल्या आठवड्यात हा सिनेमा किती कमाई करणार, शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करायला किती दिवस लागणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
‘पती, पत्नी और वोह’ छा गये!
दुसरीकडे, ‘पती-पत्नी और वोह’ या कॉमेडीपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका ( Panipat Vs Pati Patni Aur Woh) केला. कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर हे प्रॉमिसिंग नवोदित कलाकार आणि चंकी पांडेंची कन्या अनन्या पांडे ही नवखी अभिनेत्री असूनही सिनेमाने चांगलं यश मिळवलं. अवघ्या चार दिवसांतच ‘पती पत्नी’ने 41.64 कोटी कमवल्याने पहिल्या आठवड्यातच 50 कोटींचा आकडा पार होण्याची चिन्हं आहेत.
‘पती-पत्नी और वोह’ने शुक्रवारी 9.10 कोटी, शनिवारी 12.33 कोटी, शनिवारी 14.51 कोटी अशी 36 कोटींची कमाई वीकेंडला केली. तर सोमवारचे 5.70 कोटी धरुन चार दिवसांची कमाई 41.64 कोटींवर गेली आहे. ‘पानिपत’शी (20.27 कोटी) तुलना (Panipat Vs Pati Patni Aur Woh) करता पहिल्या चार दिवसात ‘पती पत्नी’ची कमाई (41.64 कोटी) दुपटीहून जास्त आहे.
#PatiPatniAurWoh stays super-strong on Day 4 [Mon]… Will comfortably hit half-century [₹ 50 cr] in *Week 1*… Neck-to-neck with #LukaChuppi, better than #SKTKS… Fri 9.10 cr, Sat 12.33 cr, Sun 14.51 cr, Mon 5.70 cr. Total: ₹ 41.64 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 10, 2019
कार्तिक आर्यनच्या प्यार का पंचनामा 2, लुकाछुपी, सोनू के टीटू की स्विटी यासारख्या सिनेमांनी चांगली कामगिरी केली होती. आता ‘पती पत्नी’च्या ट्रेलरवरुन वादाची ठिणगी पडूनही सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे.