5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको – पंकजा मुंडे

5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य अतिशय सूचक मानलं जात आहे. माझ्या समर्थकांपुढे कोणंतही पद मला मोठं नाही, असंदेखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको - पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 9:05 AM

बीड | 11 मार्च 2024 : 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य अतिशय सूचक मानलं जात आहे. माझ्या समर्थकांपुढे कोणंतही पद मला मोठं नाही, असंदेखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीडमधील सभेत कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, वनवास म्हटलं की पाचचं वर्षांचा असावा या युगात बाबा ! त्या जुन्या काळात होता वनवास 14 वर्षांचा, आम्हाला 5 वर्षंच खूप झाला. का अजून पाहिजे तु्म्हाला ? मग तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत ?

मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहीलं आहे. आत्तापर्यंत जे काही लिहीलं होतं, त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त फार काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही. पण मी फार दु:ख, यातना, वेदना, भोगून झालेल्या आहेत. ते सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतानाही चेहरा हसरा ठेवते ते केवळ तुमच्यामुळे (कार्यकर्त्यांमुळे).. तुम्ही नाही तर मला आयुष्यात काही नाही. खड्ड्यात गेलं ते पद-बिद… मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन, त्या प्रेमाची मी पावती देणार आहे, त्याची परतफेड मी करणार आहे. माझ्याकडून तुम्हाला मान खाली घालावे लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही. असे झाले तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.