Corona Update | पनवेलमध्ये 22 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या दिशेने
पनवेल मनपा क्षेत्रातील रुग्णांचा आकडा आता 393 वर पोहोचला आहे. सोमवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये एकट्या खारघरमधील तब्बल 10 रुग्ण आहेत.
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी आणखी 22 नवीन (Panvel Corona Cases Update) कोरोनाबाधित रुग्ण वाढले. पनवेल मनपा क्षेत्रातील रुग्णांचा आकडा आता 393 वर पोहोचला आहे. सोमवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये एकट्या खारघरमधील तब्बल 10 रुग्ण आहेत. यामुळे खारघरवासीयांची चिंता (Panvel Corona Cases Update) वाढली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी सोमवारी आणखी 9 रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा 217 वर गेला आहे. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये खारघरचे 10, कामोठेचे 3, नवीन पनवेलचे 5, पनवेल 2, कळंबोली 1, तळोजा 1 असा समावेश आहे.
खारघर सेक्टर 13 मधील प्राईम रोज आर्केड सोसायटीत 1,खारघर सेक्टर 21 मधील एकलव्य सोसायटीतील एकाच कुटुंबातील 2, खारघर सेक्टर 15 स्पेगेटी सोसायटीतील एकाच कुटुंबातील 3 तर खारघर सेक्टर 12 रो हाऊस क्रमांक तीन मधील एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे (Panvel Corona Cases Update).
#BREAKING : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर, राज्यात आज 2 हजार 436 नव्या रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 60 कोरोनाबळी, राज्यातील कोरोनाबळींची संख्या 1695, राज्यात आज 1186 जणांना डिस्चार्ज #CoronaUpdates #CoronavirusPandemic pic.twitter.com/bOj1L1YbBk
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
खारघरमध्ये झपाट्याने वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्याबाबत जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक निलेश बाविस्कर, भाजप नेते समीर कदम यांनी चिंता व्यक्त केली आहे. खारघरवासीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी (Panvel Corona Cases Update) यावेळी केले.
संबंधित बातम्या :
Pune Corona | पुण्यात दिवसभरात 205 नवीन कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या 5,899 वर
कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 156 तर सिंधुदुर्गात 17 रुग्ण
नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!