Panvel Rape | पनवेल क्वारंटाईन सेंटर बलात्कार प्रकरण, आरोपी कोरोनाग्रस्त, पीडितेची पुन्हा चाचणी

बलात्काराच्या आरोपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर पीडित महिलेचा निगेटिव्ह आला होता. मात्र घटनेदरम्यान दोघांचा एकमेकांशी संपर्क आल्याने आता पुन्हा एकदा महिलेची कोरोना चाचणी करण्यात येणार

Panvel Rape | पनवेल क्वारंटाईन सेंटर बलात्कार प्रकरण, आरोपी कोरोनाग्रस्त, पीडितेची पुन्हा चाचणी
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 11:31 AM

पनवेल : पनवेलमधील क्वारंटाईन सेंटर अत्याचार प्रकरणातील पीडित महिलेची पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार आहे. आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे महिलेची पुन्हा टेस्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Panvel Quarantine Center Rape Victim to undergo Corona Test again as Accuse is COVID19 Positive)

पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये 16 जुलै रोजी महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. क्वारंटाईन सेंटरमध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर आरोपीने बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिला आणि आरोपी या दोघांमध्येही कोरोनाची लक्षण दिसून येत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्या आरोपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर पीडित महिलेची चाचणी निगेटिव्ह आली होती.

चाचणी झाल्यानंतर गुरुवारी (16 जुलै) मध्यरात्री बलात्काराची घटना घडली. घटनेदरम्यान दोघांचा एकमेकांशी संपर्क आल्याने आता पुन्हा एकदा महिलेची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयित किंवा हाय रिस्क व्यक्तींना क्वारंटाईनची व्यवस्था कोण येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार घडला होता.

दरम्यान, पीडित महिलेचा पती अपंग असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पती पीडित पत्नीला क्वारंटाईन सेंटरमध्ये भेटण्यासाठी आला होता. “माझ्या पत्नीसोबत असे कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करावी” अशी मागणी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केली.

(Panvel Quarantine Center Rape Victim to undergo Corona Test again as Accuse is COVID19 Positive)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.