चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने पहाटे आत्महत्या केल्याचा प्रकार  (Panvel Taloja Jail Prisoner Suicide) उघडकीस  आला आहे.

चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 9:06 PM

पनवेल : तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने पहाटे आत्महत्या केल्याचा प्रकार  (Panvel Taloja Jail Prisoner Suicide) उघडकीस  आला आहे. या बातमीने कारागृहातील कैद्यांसोबाबत अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. शौचालयाच्या खोलीत चादर अडकवून त्या कैद्याने आत्महत्या केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बालू गड़सिंगे असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने पहाटे 5 च्या दरम्यान आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. गड़सिंगे याच्यावर 4 ते 5 गुन्हे दाखल असून तो न्यायबंदी होता. त्याच्यावर माजलगाव, शिवाजी नगर अशा ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल होते. यामुळे तो 302 व 354 गुन्ह्याअंतर्गत 2017 पासून शिक्षा भोगत होता.

गेल्यावर्षी कल्याण जेलमधून तळोजा जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. मात्र तो आल्यापासून स्वभावाने रागीट असल्यामुळे त्याचे इतर कैद्यांसोबत पटत नव्हते. इतरांशी पटत नसल्यामुळे त्याला कारागृहातील विशेष कक्षात ठेवण्यात आलं होते. यावेळी त्याने कैद्यांना देण्यात येणाऱ्या चादरीने बंदिस्त असलेल्या शौचालयाच्या खोलीत खिडकीच्या गजाला चादर अडकवून आत्महत्या केली.

दरम्यान कारागृह मुख्य अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या कैद्याच्या मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट आहे. या कैद्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी (Panvel Taloja Jail Prisoner Suicide) सांगितले.

संबंधित बातम्या : 

तीन महिन्यांच्या बाळाच्या हत्येची तक्रार, आईच निघाली खुनी

दरोड्यातील रक्कम नेपाळच्या माओवाद्यांना, मुंबईत दया नायक यांच्या पथकाकडून दरोडेखोराला अटक

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.