Parbhani : आयुष्यभर ज्या वीज खांबावर काम केलं, तिथेच केला आयुष्याचा शेवट, परभणीच्या पाथरीमधील धक्कादायक घटना
परभणीच्या पाथरी शहरातील गुरजार नगर येथे निवृत्त लाईनमनने विद्युत खांबाला गळफास घेऊन विचित्र प्रकारे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्योधन गवई असं 65 वर्षीय गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या लाईनमनचं नाव आहे. घरासमोरील विद्युत पोलला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे पाथरीत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
परभणी : परभणीच्या (Parbhani) पाथरी शहरातील गुरजार नगर येथे निवृत्त लाईनमनने (Llineman) विद्युत खांबाला गळफास (Succide) घेऊन विचित्र प्रकारे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्योधन गवई असं 65 वर्षीय गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाथरी शहरातील गुरजार नगर येथे राहणाऱ्या निवृत्त लाईनमनचं नाव आहे. कैटुंबिक वादातून निवृत्त लाईनमन दुर्योधन गवई यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. घरगुती भांडणावरून एका निवृत्त लाईनमनने टोकाचे पाऊल उचलत घरासमोरील विद्युत पोलला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे पाथरीत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मात्र, अशा प्रकारे घरासमोरील विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यामागे नेमंक काय कारण आहे. याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय.
मृत्यूही विद्युत खांबावर
दुर्योधन यांनी कौटुंबिक भांडणातून दोन दिवसांपूर्वी पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करत शव ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत पाथरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, अद्यापपर्यंत तरी घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला नाहीये. पहाटे उघडकीस आलेली ही विचित्र आत्महत्येची घटना पाथरी शहरासह परिसरात चर्चेचा विषय बनली असून, आयुष्यभर ज्या वीज खांबावर चढून कर्तव्य बजावणाऱ्या लाईनमॅनने आयुष्य संपवण्यासाठीही त्याचं विद्युत खांबाचा आधार घेतल्याचं बोललं जातंय.
विचित्र घटनेमुळे आश्चर्य
कौटुंबिक वाद कुणाच्या घरात नसतात. पण, तेट आत्महत्येचं पाऊल उचलने योग्य नाही. परभणीच्या पाथरीमध्ये गुरजार नगर येथे निवृत्त लाईनमनने विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कैटुंबिक वादातून निवृत्त लाईनमन दुर्योधन गवई यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. घरगुती भांडणावरून एका निवृत्त लाईनमनने टोकाचे पाऊल उचलत घरासमोरील विद्युत पोलला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे पाथरीत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुर्योधन यांनी कौटुंबिक भांडणातून दोन दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करत शव ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत पाथरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, अद्यापपर्यंत तरी घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला नाहीये.
इतर बातम्या