पार्थ पवार आणि लक्ष्मण जगतापांच्या भेटीने भुवया उंचावल्या

पुणे: मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील तरुण मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले होते. त्यावेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील त्यावेळी मंडळांच्या भेटीसाठी तिथे आले होते. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. दोघांनी एकमेकांची विचारपूस करुन हातात […]

पार्थ पवार आणि लक्ष्मण जगतापांच्या भेटीने भुवया उंचावल्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पुणे: मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील तरुण मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले होते. त्यावेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील त्यावेळी मंडळांच्या भेटीसाठी तिथे आले होते. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. दोघांनी एकमेकांची विचारपूस करुन हातात हात दिला.

या दोघांमध्ये इथे कुठलीच राजकीय चर्चा झाली नसली तरी, हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मावळमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात आहेत. मात्र श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला लक्ष्मण जगताप यांचा विरोध आहे. ते सध्या नाराज आहेत. स्वत: लक्ष्मण जगताप मावळमधून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी शेवटपर्यंत मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी प्रयत्न केला. पण ही जागा शिवसेनेकडे असल्याने श्रीरंग बारणे यांनाच तिकीट मिळालं.

त्यामुळे नाराज जगताप आता युतीचा प्रचार करणार का? असा सवाल राजकीय जाणकारांना पडला असताना, आज पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप एकत्र आल्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या सहकाऱ्यांनी श्रीरंग बारणे यांच्याविरोधात काम करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप यांच्या आजच्या भेटीला महत्व आहे. बारणे आणि लक्ष्मण जगताप हे राजकरणतील विरोधक आहेत. लक्ष्मण जगताप युतीचा धर्म निभावणार की अजित पवार यांना मदत करुन मागील निवडणुकीचा बदला घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचा श्रीरंग बारणेंनी पराभव केला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.