सांगलीत जीपची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू तर जालन्यात तरुणाला स्विफ्टने फरफटत नेले…

राज्यात विविध भागात काल आणि आज सकाळी घडलेल्या विविध अपघातात किमान सहा जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहे. सांगली - तासगाव मार्गावर कोल्हापूरवरुन येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.भोकरदन तालुक्यात एका भरधाव स्विफ्ट डिझायरने तरुणाला ५०  फूट लांब फरफटत नेल्याची घटना घडली आहे.

सांगलीत जीपची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू तर जालन्यात तरुणाला स्विफ्टने  फरफटत नेले...
जालनात दिलीप नावाच्या तरुणाला स्विफ्ट कारने तरुणाला फरफटत नेल्याने त्याचा मृत्यू झाला
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 5:03 PM

सांगली तासगाव मार्गावर कोल्हापूरवरुन येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवर पाठी बसलेल्या महिलेचा आणि तिच्या दोन बालकांचा मृत्यू तर दुचाकी चालक पती जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे. तर जालनातील भोकरदन तालुक्यात एका भरधाव स्विफ्ट डिझायरने रात्री पायी चालत जाणाऱ्या तरुणाला ५०  फूट लांब फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. धाराशीव येथे शाळेत घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रकने ठोकरल्याने मृत्यू झाला आहे. तसेच पुणे – नाशिक महामार्गावर कळंब येथे टेम्पो आणि पिकअप वाहनामध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण टक्कर होऊन १ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात नागरिक जखमी झाले आहेत.

सांगली तासगाव मार्गावर कवलापूर कुमठे रोडवरील एस आर पेट्रोल पंप समोर हा भीषण अपघात झाला. अपघातातील दुर्दैवी भारगुडे कुटुंब हे मूळचे आटपाडी तालुक्यातील तळेगाव येथील असून गेल्या काही वर्षांपासून ते सांगली राहत होते. आज सकाळी विशाल हे पत्नी दिपाली मुलगा राजकुमार आणि सार्थक यांच्यासह दुचाकीवरून आटपाडी तळेवाडी येथे लग्न सोहळ्यासाठी चालले होते. कवलापूर कुमठे रोडवर पेट्रोल पंपासमोर अचानक समोरून येणाऱ्या वडाप जिपने दुचाकीला उडवले. या अपघातात स्वतः विशाल हे हेल्मेट घातल्यामुळे जखमी झाले तर पत्नीसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जीप चालकाने तेथून पलायन केले.अपघाताच्या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

जालनात स्विफ्ट कारने तरुणाला फरफटत नेले

अजिंठा बुलढाणा महामार्गावरील भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास पायी चालत जाणाऱ्या एका हॉटेल कामगार तरुणाला भरधाव स्विफ्ट कारने ठोकरुन ५० ते ६० फूट फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या २३  वर्षीय तरुणाचा जागीच मृ्त्यू झाला आहे. दिलीप हा तरुण धावडा येथील एका हॉटेलवर वेटरचे काम करत होता. काम संपल्यानंतर तो नित्य नियमाने घरी जात असताना त्याच वेळी अजिंठाकडून बुलढाण्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने या तरुणाला जोरदार धडक दिली आणि हा तरुण लांब फरफटत गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाआहे. ही कार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची आहे. प्रकरणाचा अधिक तपास पारध पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्यांचा मृत्यू

धाराशिव शहरात शाळेतून घरी येत असताना तेरा वर्षीय चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना काल घडली आहे. या घटनेनंतर पालक आक्रमक झाले असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. ही शाळा हायवेच्या बाजूला असून डी मार्ट तसेच मंगल कार्यालय असे रहदारीचे ठिकाण असतानाही येथे सर्व्हीस रोड नसल्याने अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी तातडीने सर्व्हीस रोड बांधावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी धाराशिव शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आंबेगावात वाहन अपघातात एक ठार तर तीन जखमी

पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे टेम्पो आणि पिकअप वाहनामध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण टक्कर होऊन १ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याचे उघ़डकीस आले आहे.पुणे- नाशिक महामार्गावर सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने एका लेनने वाहतूक सुरू असल्याने ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. एका लेनने वाहतूक सुरू असताना कोणतेही दिशा दर्शक फलक नसल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून अपघातानंतर पुणे – नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

धाराशिव येथे कारचा अपघात, सात प्रवासी जखमी

मुंबई हैदराबाद हायवेवर जेकेकुर गावाजवळ दोन कारचा धडक होऊन सात प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. हैदराबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावरती उमरगा तालुक्यातील जेकेकूर येथे दोन कारच्या झालेल्या अपघातामध्ये सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.सोलापूरहून हैदराबाद कडे जाणाऱ्या ( टी एस ०५ एफ आर १२४७ ) या कारचा आणि रस्ता ओलांडणाऱ्या ( एम एच १२ एन जे ९३५१ ) या कारचा टक्कर झाल्याने दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

इगतपुरीत स्विफ्ट कारला धडक, महिला जखमी

मुंबई- आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे जवळ स्विफ्ट कारला अज्ञात वाहनाने आज पहाटेच्या सुमारास धडक दिल्याने कारमधील महिला गंभीर जखमी तर अन्य एकजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला आहे. जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

इंदापूर येथे दहा ते बारा वाहने एकमेकांवर आदळली

भरधाव ट्रक चालकाने मागून ठोकल्याने दहा ते बारा वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज येथे घडली आहे. या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु आहे. एम एच 46 बी यू 9038 क्रमांकाच्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.