गोविंदबागेत पवार कुटुंबाचे पाडवा सेलिब्रेशन
शरद पवार यांनी बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी सहकुटुंब दिवाळी पाडवा साजरा केला

पाडव्याचा सण साजरा केल्यानंतर पवार कुटुंबीयांनी गोविंद बागेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत सहकुटुंब दिवाळी पाडवा साजरा केला
- शरद पवार यांच्या गोविंदबागमधील निवासस्थानी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिभा पवार यांनी शरद पवार यांचे औक्षण केले
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांनी ओवाळले.
- खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांचे औक्षण केले
- आमदार रोहित पवार यांना कुंती पवार यांनी ओवाळले
- पाडव्याचा सण साजरा केल्यानंतर पवार कुटुंबीयांनी गोविंद बागेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.