Corona : सीएए आणि एनआरसीच्या भीतीने बुलडाण्यात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी हाकलून लावले
मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरातून शासकीय यंत्रणांना स्थानिक नागरिकांनी हाकलून (Buldana corona virus case) लावले.
बुलडाणा : मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरातून शासकीय आणि वैद्याकीय यंत्रणांना स्थानिक नागरिकांनी हाकलून (Buldana corona virus case) लावले. सीएए आणि एनआरसी संबंधित हा सर्व्हे सुरु असल्याच्या अफवेने सर्वेक्षण करण्यास स्थानिकांना नकार दिला. स्थानिक नागरिक सहकार्य करत नसल्याने प्रतिबंधाला अडचणी येत असल्याचे वैद्यकीय तपासणी करणाऱ्या (Buldana corona virus case) अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुलडाणा शहरामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला त्या परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी आणि नोंद करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने 500 मीटरचा विभाग सील केला आहे. या भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणीकरीता तेथे काही कर्मचारी गेले असता त्यांना त्या ठिकाणावरून हाकलून लावल्याचा प्रकार घडला. सीएए आणि एनआरसीचा सर्व्हे सुरु असल्याची अफवा येथे पसरवल्यामुळे नागरिकांनी सर्व्हेक्षणास विरोध केला.
ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेथे वैद्यकीय तपासणी आणि सर्व्हेक्षण करण्यासाठी 65 जणांचे पथक तयार केले आहे. मात्र काल (31मार्च) दुपारी तपासणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी सहकार्य न करता असभ्य वागणूक देऊन परिसरातून हाकलून दिले. काही नागरिकांनी तर अपशब्दही वापरले. या परिसरातील नागरिकांना कोणीतरी सीएए आणि एनआरसीचा सर्व्हे असल्याची अफवा पसरवल्याने हा प्रकार घडला.
हा असा प्रकार घडत असल्याने प्रशासनाला प्रतिबंधक उपाय योजना करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यावर जिल्ह्या प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सर्व वैद्यकीय पथके परत जिल्हा परिषद कार्यालयात आली होती. मात्र परिसरातल्या नगरसेवक आणि समजदार व्यक्तींनी समजावून सांगितल्यावर सर्वेक्षण सुरु झाले आहे. तर नागरिकांनी सहकार्य करुन आपल्या आरोग्याची तपासणी करुण घ्यावी आणि स्वतःलाच नव्हे तर इतरांना सुद्धा वाचवावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यानी बुलढाणा शहरवासियांना केली आहे.