Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातही मद्यविक्री आणि निर्मितीस मंजुरी दिली आहे (Permission to Alcohol and wine shop in pune ).

पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 7:26 PM

पुणे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मुदत वाढ करतानाच सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता मद्यविक्रीवरील निर्बंधही कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातही मद्यविक्री आणि निर्मितीस मंजुरी दिली आहे (Permission to Alcohol and wine shop in pune ). असं असलं तरी यातून कंटेनमेंट झोनला वगळण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मनपाच्या भागात मद्यविक्रीवर निर्बंध असणार आहेत.

उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मद्यनिर्मिती आणि विक्रीला मंजुरी दिली आहे. पुणे शहरात प्रतिबंधित क्षेत्रात मद्यविक्री होणार नाही. संध्याकाळी 6 नंतर मद्यविक्रीवर सर्व ठिकाणी पूर्णपणे बंदी असणार आहे. घाऊक विक्रेत्यांना 50 टक्के कर्मचारीच ठेवण्यास परवानगी आहे. मद्यविक्रीत केवळ सीलबंद मद्याच्या विक्रीलाच मंजुरी देण्यात आली आहे. महापालिका, नगरपरिषद क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी आहे. एकावेळी दुकानासमोर फक्त 5 ग्राहक असण्याचीही अट ठेवण्यात आली आहे. तसेच दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचं अंतर असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दुकानं व परिसर दर 2 तासांनी निर्जंतुक करण्याच्या सक्त सुचनाही मद्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनचे नियम पाळण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. दुकानांमध्ये मद्यप्राशन करण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

मद्य निर्मिती आणि विक्रीबाबत:

  • पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व मद्य निर्मिती सुरु होईल
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील औद्योगिक वसाहती आणि टाऊनशिपमधील मद्य निर्मिती सुरु होईल
  • मद्य निर्मितीच्या ठिकाणी कामगारांची थर्मल स्किनिंग करावी, ज्या कामगारांना सर्दी, खोकला आणि ताप यासारखे लक्षणे आहेत त्यांना प्रवेश देऊ नये
  • मद्य निर्मिती करताना फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम कसोशीने पाळावेत
  • मद्य विक्री करताना एकावेळी दुकानासमोर 5 पेक्षा अधिक लोक असू नयेत
  • फिजीकल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक
  • ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करावेत
  • सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाही

दरम्यान, लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली. रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सांगितले. मात्र पुणे शहरातील कंटेनमेंट क्षेत्रात मद्य विक्रीची दुकानं बंदच राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकानं सुरु करण्यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासन आदेश काढला आहे. यात मद्यविक्री आणि निर्मितीसाठी लागू करण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचीही माहिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

मद्यप्रेमींना दिलासा, महाराष्ट्रात ‘रेड झोन’मध्येही दारु विक्रीला सशर्त परवानगी

महाराष्ट्रात दारुची दुकानं उघडणार, पण नियम काय?

संबंधित व्हिडीओ :

Permission to Alcohol and wine shop in pune

तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले.
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक.
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.