पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलग सहाव्या दिवशी वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. अशीच परिस्थिती मंगळवारी सहाव्या दिवशीही बघायला मिळत आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 28 पैसे तर डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 29 पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोल 70.41 रुपये तर डिझेल 64.47 रुपये प्रतिलिटर इतका […]
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. अशीच परिस्थिती मंगळवारी सहाव्या दिवशीही बघायला मिळत आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 28 पैसे तर डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 29 पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोल 70.41 रुपये तर डिझेल 64.47 रुपये प्रतिलिटर इतका दर आहे. तर मुंबईत पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 28 पैसे आणि डिझेलच्या किमतीत 31 पैशांची वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोलचा भाव 76.05 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा भाव 67.49 रुपयांवर येऊन पोहोचला आहे.
पेट्रोल-डिझेल हे सलग सहाव्या दिवशी महागले आहे. नव्या वर्षात सातव्यांदा ही भाववाढ झाली आहे. नव्या वर्षात दिल्लीत पेट्रोल 2 रुपये 12 पैसे तर डिझेल 2 रुपये 31 पैसे प्रतिलिटर वाढले आहे.
याआधी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात अनुक्रमे प्रतिलिटर 38 पैसे आणि 49 पैशांची वाढ झाली होती. यानंतर दिल्लीत पेट्रोल 70 चा आकडा पार करत 70.13 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 64.18 प्रतिलिटर झाले होते. तर मुंबईत पेट्रोलचा भाव 75.77 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 67.18 रुपये प्रतिलिटर होता. रविवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 49 पैसे आणि 59 पैसे इतकी वाढ झाली होती.
गेल्या वर्षी 18 ऑक्टोबरनंतर पेट्रोलियम दरांत मोठी घट झाली होती. यावेळी पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 14.54 रुपये तर डिझेलचा भाव प्रतिलिटर 13.53 रुपये इतका घसरला होता. तेव्हा पेट्रोलचा भाव 68.29 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा भाव 62.16 रुपये प्रतिलिटर होता.