Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढीला केवळ रविवारची सुट्टी, पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा वाढले

मुंबईत पेट्रोल 87.17 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.81 रुपये प्रतिलिटर दर आहे. पेट्रोल 5 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 12 पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे.

Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढीला केवळ रविवारची सुट्टी, पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा वाढले
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 8:16 AM

मुंबई : सलग 21 दिवस सुरु असलेली इंधन दरवाढ केवळ रविवारच्या दिवशी थांबली होती, मात्र सोमवारचा दिवस उजाडताच ही घोडदौड पुन्हा सुरु झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव मुंबई-दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात पुन्हा वाढले आहेत. (Petrol Diesel Price Hike Begins Again)

मुंबईत पेट्रोल 87.17 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.81 रुपये प्रतिलिटर दर आहे. पेट्रोल 5 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 12 पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे.

दिल्लीत पेट्रोल 80.43 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 80.53 रुपये प्रतिलिटर दर आहे. डिझेलच्या किमती पेट्रोलपेक्षा अधिक झाल्याचं दिल्लीत पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 21 दिवसांनंतर इंधन दरवाढीला ब्रेक मिळाल्याने काल (रविवारी) वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला होता. पेट्रोल डिझेलचे भाव काल स्थिर राहिले आहेत. मात्र हा दिलासा केवळ एक दिवसाचा ठरला.

हेही वाचा : इंधन दरवाढीला 21 दिवसांनंतर ब्रेक, पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर

गेल्या तीन आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर जवळपास 9.17 रुपये, तर डिझेल 11.13 रुपयांनी महागले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून इंधन दरवाढ सुरुच आहे. 23 दिवसात एकदाही इंधनदर कमी झालेले नाहीत. केवळ 28 जूनला भाव स्थिर राहिले होते. तीन आठवडे सलग इंधन दरवाढ सुरुच राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालक पुरते त्रासून गेले होते.

लॉकडाऊनच्या काळात इंधनाच्या विक्रीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे 16 मार्च ते 5 मे या कालावधीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. (Petrol Diesel Price Hike Again)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.