Petrol Desial Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या चार दिवसांपासून स्थिर; मुंबईत आहे इतका दर; आपल्याही शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर
देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा प्रतिलिटर दर 104.41 रुपये होता, तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईः देशातील प्रमुख तेल कंपन्यांकडून रविवारी ( ता. 10) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol-Diesel) जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांकडून नवीन दर जाहीर करण्यात आले असले तरी मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली नाही. आज चौथ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात एवढा मोठा बदल झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दिल्ली-मुंबईसह (Delhi-Mumbai) देशातील बहुंताशी प्रमुख शहरातून जुन्या किंमतीप्रमाणेच पेट्रोल-डिझेलची विक्री सुरु राहणार आहे. देशातील तेलं कंपन्यांकडून 6 एप्रिल रोजी शेवटची दरवाढ करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नसून मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रति लिटर (Price)आहे.
देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा प्रतिलिटर दर 104.41 रुपये होता, तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रति लिटर आहे. दिल्ली-मुंबईबरोबरच चेन्नईमध्ये आज पेट्रोलच दर 110.85 तर डिझेलचा दर 100.94 प्रतिलिटर आहे. कोलकातमध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेलचा दर 99.83 रुपये इतका आहे.
येथे क्लिक करा आणि आपल्या शहरातील दर जाणून घ्या
राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरात गेल्या चार महिन्यांपासून 22 मार्चपासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत होती. त्यानंतर दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर किमान 14 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती. दिल्लीत 21 मार्च रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत ही 95.41 रुपये होती, त्यानंतर 6 एप्रिल रोजीही पेट्रोलच्या दरात वाढ होऊन 105.41 किंमत झाली होती. त्यानंतर मात्र 6 एप्रिलपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये स्थिरता दिसून आली.
संबंधित बातम्या
Pune : अनिल बोंडेंच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादीनं केली हडपसर पोलिसांत तक्रार दाखल
महाराष्ट्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेट मॅच,’एमबीसीसीएल’च्या लोगोचे अनावरण