बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आज (21 एप्रिल) मुंबईत पत्नी नताशा दलालसोबत (Natasha Dalal) दिसला. ते दोघे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. तेथे त्या दोघांचाही खास अंदाज पहायला मिळाला.
वरुण धवन ग्रे टीशर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसला.
वरुण धवन आणि नताशा या दोघांची जोडी चांगलीच उठून दिसत होती.
वरुण धवन आज अनेक दिवसांनंतर आपला चित्रपट भेडियाच्या शुटिंगसाठी मुंबईत परतला होता.
विशेष म्हणजे वरुणसोबत त्याची पत्नी देखील शूटवर गेली होती.
विमानतळावरुन वरुण आणि त्याची पत्नी घराकडे जाण्यास निघाले.
माध्यमांशी बोलताना वरुणने सर्वांना आपली काळजी घेण्याचं आवाहन केलं.