चटकदार लोणचं बनवता येतं? मग आकर्षक बक्षीसाची संधी, औरंगाबादची आगळी वेगळी स्पर्धा, कुठे करणार नोंदणी?

उद्या रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी घरूनच बनवून आणलेले लोणचे घेऊन दुपारी 2 वाजेपर्यंत नियोजित स्थळावर पोहोचावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

चटकदार लोणचं बनवता येतं? मग आकर्षक बक्षीसाची संधी, औरंगाबादची आगळी वेगळी स्पर्धा, कुठे करणार नोंदणी?
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 4:02 PM

औरंगाबादः शहरातील सुगरण महिला आणि स्वयंपाक तरबेज असलेल्या सर्वांसाठी एक विशेष स्पर्धा (Competition for women) आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या ताटात डाव्या बाजूची शान वाढवणारी गोष्टी म्हणजे लोणचं. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाची चव आणि पोटाची भूक भागवण्यासाठी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लोणचं. प्रत्येक घरात, कुटुंबात, प्रत्येक गृहिणीची लोणचं बनण्याची पद्धत वेगळी असते. कुणी पारंपरिक लोणच्यासोबतच नव-नवीन प्रकारचे लोणचे करून पाहतात. अशा सगळ्या खवय्यांसाठी औरंगाबादमध्ये एक आकर्षक स्पर्धा (Pickle Making) आयोजित करण्यात आली आहे. त्यातून उत्कृष्ट, चविष्ट लोणचे निवडले जाईल आणि ही पाककृती करणाऱ्याला आकर्षक बक्षीसही दिले जाईल. औरंगाबादमधील स्वयम् फाऊंडेशन (Swayam Foundation) आणि श्री पैठणी या संस्थांच्या वतीने ही आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उद्या रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी घरूनच बनवून आणलेले लोणचे घेऊन दुपारी 2 वाजेपर्यंत नियोजित स्थळावर पोहोचावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेचे नियम आणि अटी काय?

– ताजे लोणचे ,पारंपरिक लोणचे , नाविन्यपूर्ण लोणचे अशा तीन गटात स्पर्धकांना भाग घेता येईल. – स्पर्धकाला लोणचे घरीच तयार करून घेऊन यायचे आहे. – प्रत्येक गटात 3 क्रमांक काढण्यात येणार आहे , – स्पर्धेचे परीक्षक हे या क्षेत्रातले आणि खाद्य संस्कृतीमधील तज्ञ असतील आणि त्यांचा निर्णय हा अंतिम असेल – लोणचे शाकाहारी असावे. – लोणच्याची पाककृती सोबत लिहून आणावी , त्याची मांडणी सुबक असावी … – मारवाडी ,राजस्थानी , बंगाली ,गुजराथी , मराठी ,आसामी किंवा देशभरातील कोणत्याही भागाचे त्याने प्रतिनिधित्व करावे … – लोणचे टिकाऊ असल्याने,टिकाऊ आणि ताजे ,लगेचच संपणारे अशा दृष्टीनेही विशेष लोणचे बनवता येईल.

कुठे करणार नोंदणी?

अशी स्पर्धा आपल्या भागात पहिल्यांदा होत असल्याने जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रत्येक गटात प्रत्येकी तीन क्रमांक म्हणजे एकूण नऊ बक्षीस आहेत.. 13 फेब्रुवारी रोजी रविवारी दुपारी उल्कानगरी येथील पत्त्यावर लोणचे आणून त्यासोबत लोणच्याची रेसिपी आणावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कुठे कराल नोंदणी?

9325227970 शीतल रुद्रवार 7507777268 वृषाली घाटणेकर 9881153166 स्वाती कुलकर्णी

स्पर्धेचे स्थळ

शॉप नं- 12, एफ ए खिवंसरा ऑगस्ट हायस्ट्रीट, उल्कानगरी औरंगाबाद.

इतर बातम्या-

म्हणाला मी ‘कोकाकोला’चा सीईओ, टिंडर डेटिंग अ‍ॅपवर ओळख, औरंगाबादेत उच्चशिक्षित महिलेला 97 हजारांचा गंडा

ऐपत नसेल तर आम्ही बिल देऊ! Aurangabad मनपाने शिवजयंतीचे बिल थकवले, आयुक्तांना कुणी दिला इशारा?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.