BMW जवळ लघुशंका करताना हटकल्याचा राग, पिंपरीत रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकाला पेटवले

सुरक्षारक्षक भगवान वायफळकर हे 20 टक्के भाजले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

BMW जवळ लघुशंका करताना हटकल्याचा राग, पिंपरीत रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकाला पेटवले
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 6:29 PM

पिंपरी चिंचवड : बीएमडब्ल्यू कंपनीच्या आलिशान गाडीजवळ लघुशंका करताना हटकल्याच्या रागातून रिक्षाचालकाने वॉचमनला पेटवले. पिंपरी चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी सेक्टर दहा भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. जखमी सुरक्षारक्षकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pimpri Chinchwad Rickshaw Driver sets Watchman on fire for objecting peeing near BMW Car)

सुरक्षारक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल (मंगळवार 17 नोव्हेंबर) दुपारी घडली. भगवान शंकर वायफळकर असं 41 वर्षीय सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. हा प्रकार एस व्ही एन्टरप्रायजेस कंपनीजवळ घडला.

नेमकं काय घडलं?

भगवान वायफळकर हे एस व्ही एन्टरप्रायजेस या रिक्षाचे पार्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या कंपनीसमोर वायफळकर यांच्या मालकाची बीएमडब्लू कार पार्क केली होती. महेंद्र बाळू कदम हा 31 वर्षीय रिक्षाचालक मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गाडीजवळ लघुशंका करत असताना वायफळकरांना दिसला.

आरोपी महेंद्र कदमला वायफळकर यांनी अडवले आणि जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने वायफळकर यांच्या अंगावर आपल्याजवळ असलेल्या बाटलीतील पेट्रोल टाकले. त्यानंतर स्वतःजवळ असलेल्या लायटरने त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. वायफळकरांना पेटवल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

या प्रकारात सुरक्षारक्षक भगवान वायफळकर हे 20 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर डी वाय पाटील या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी महेंद्र कदम याच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली आहे. (Pimpri Chinchwad Rickshaw Driver sets Watchman on fire for objecting peeing near BMW Car)

संबंधित बातम्या :

घरासमोर फटाके फोडण्यास मनाई करताच मद्यधुंद तरुणांची वृद्धेसह कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये खळबळ

शौचालयाच्या टाकीचे झाकण उघडे, खेळण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

(Pimpri Chinchwad Rickshaw Driver sets Watchman on fire for objecting peeing near BMW Car)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.