पिंपरी चिंचवडमध्ये 48 कोरोनाग्रस्त, भोसरी-दिघीत सर्वाधिक, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या
पिंपरी चिंचवड परिसरात सापडलेल्या 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात उपचार घेत आहेत (Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)
पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत येणाऱ्या परिसरातही ‘कोरोना’चा विळखा वाढताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 48 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक हे भोसरी, दिघी, चऱ्होली, बोपखेल भागात आहेत. (Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)
पिंपरी चिंचवड परिसरात सापडलेल्या 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात उपचार घेत आहेत. भोसरी, दिघी, चऱ्होली, बोपखेल या ई प्रभागात सर्वात जास्त म्हणजे 15 रुग्ण आहेत.
पिंपरी चिंचवड प्रभागनिहाय कोरोना रुग्ण आकडेवारी
प्रभाग अ – निगडी, प्रधिकरण, आकुर्डी, संभाजीनगर, शाहूनगर – 01
प्रभाग ब – रावेत, किवले, मामुर्डी, चिंचवड – 00
प्रभाग क – खराळवाडी, मोशी, चिकली, इंद्रायणी नगर, नेहरु नगर, अजमेरा कॉलनी – 09
प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे – 00
प्रभाग ई – भोसरी, दिघी, चऱ्होली, बोपखेल -15
प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली, रुपीनगर, त्रिवेणीनगर – 02
प्रभाग ग – पिंपरी, थेरगाव, रहाटणी – 04
प्रभाग ह – दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, सांगवी – 04
(Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर अद्यापही सर्वाधिक आहे. राज्यातील मृत्यूदर 6.41 टक्के आहे, परंतु पुण्यातील ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यूदर दहा टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत गेले असले, तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक मृत्यू पुण्यात आहेत.
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात एका दिवसात 69 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 506 वर गेली आहे, तर 47 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यानंतर राज्यात सर्वाधिक म्हणजे 9.3 टक्के मृत्यूदर पुण्यात असल्याचं दिसून येतं.
नवे रुग्ण आढळण्याचा वेग मुंबईत सर्वाधिक असला, तरी मृत्यूदर पुण्याच्या तुलनेत कमी आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत एकूण 111 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर 6.3 टक्के राहिला आहे
ससून रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर आजार किंवा शस्त्रक्रिया झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत, मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात https://t.co/PqSyWcAC16
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2020
(Pimpri Chinchwad Ward wise Corona Patients)