Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Garib Kalyan Ann Yojana | 80 कोटी नागरिकांना आणखी 5 महिने मोफत धान्य : पंतप्रधान मोदी

80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहील, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली PM Garib Kalyan Ann Yojana

PM Garib Kalyan Ann Yojana | 80 कोटी नागरिकांना आणखी 5 महिने मोफत धान्य : पंतप्रधान मोदी
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 4:40 PM

PM Modi Live नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहील, पुढील 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 1 किलो हरभरा डाळ मोफत देणार अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. (PM Narendra Modi addresses Nation)

80 कोटीपेक्षा जास्त व्यक्तींना तीन महिन्याचे रेशन मोफत देण्यात आले, अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच पट जनतेला आपल्या सरकारकडून मोफत अन्नधान्य दिल्याचं मोदींनी सांगितलं.  (PM Garib Kalyan Ann Yojana). 

नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण

कोरोनाविरोधात लढताना आपण अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. याशिवाय सर्दी, खोकला, ताप या आजारांची लागण होणाऱ्या वातावरणातही आपण प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत माझी देशातील सर्व नागरिकांना प्रार्थना आहे की, सगळ्यांची काळजी घ्या.

जगभरातील देशांच्या तुलनेने भारताची स्थिती चांगली आहे. योग्य वेळी करण्यात आलेला लॉकडाऊन आणि इतर निर्णयामुळे भारतात लाखो लोकांचा जीव वाचला. पण जेव्हापासून देशात अनलॉक 1 सुरु झालं आहे, तेव्हापासून व्यक्तीगत आणि सामाजिक व्यवहारात निष्काळजीपणा वाढत चालला आहे. सुरुवातीला आपण मास्क वापरणं, सोशल डिस्टिन्सिंग ठेवण्यात आणि हात धुण्याबाबत खूप सतर्क होतो. मात्र, आज जेव्हा आपल्याला जास्त सतर्कताची गरज असताना निष्काळजीपणा वाढणं चिंताजनक आहे.

लॉकडाऊनदरम्यान खूप गंभीरपणे नियमांचं पालन केलं गेलं. आतादेखील राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि देशाच्या नागरिकांना तशाचप्रकारे गांभीर्याने घेणं जरुरीचं आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये तर प्रचंड लक्ष द्यावं लागेल. जे नियमांचं पालन करणार नाही, त्यांना समजावावं लागेल.

एका देशाच्या पंतप्रधानांना 13 हजार रुपयांचा दंड लागला कारण ते सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गेले होते. भारतातही स्थानिक प्रशासनाला अशाचप्रकारे काम करावं लागेल. हे 130 कोटी देशवाशीयांच्या संरक्षणाचं एक अभियान आहे. भारतात गावाचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान असो सर्वांना नियम सारखे आहेत. कुणीही नियमांपेक्षा मोठा नाही.

लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारची देशातील प्रत्येक घरात चूल पेटालं ही सर्वात पहिली प्राथमिकता होती. एकाही नागरिकाने भुकेल्या पोटी झोपू नये यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली.

देश असो किंवा व्यक्ती वेळेवर आणि संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यावर कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती वाढते. लॉकडाऊन होताच सरकार प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना घेऊन आलं. या योजने अंतर्गत गरिबांसाठी 1.75 लाख कोटींचं पॅकेज दिलं गेलं. गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी कुटुंबांच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

यासोबतच गावांमध्ये श्रमिकांना रोजगार देण्यासाठी प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचं अभियान वेगाने सुरु आहे. या अभियानासाठी सरकार 50 हजार कोटी रुपयांचा खर्च करत आहे.

कोरोनाने जगाला हैराण केलं आहे. कोरोनासोबत लढताना भारतात 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना 3 महिन्यांचे रेशन पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्यात आले. याशिवाय 1 किलो डाळदेखील मोफत दिलं गेलं. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अडीच पटीने जास्त लोकसंख्येला, ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा 12 पटीने जास्त लोकांना आमच्या सरकारने मोफत अन्नधान्य दिलं आहे.

पावसाळ्यात कृषी क्षेत्रात जास्त काम होतं. अन्य दुसऱ्या क्षेत्रांमध्ये थोडी सुस्थी असते. जुलैपासून हळूहळू सण, उत्सव सुरु होतात. सण, उत्सांमध्ये खर्चही होता. या गोष्टींचा विचार करुन प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यांच्या शेवटपर्यंत केला जाईल. पुढच्या पाच महिन्यातही 80 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना प्रत्येक महिन्यात 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत दिलं जाईल. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला 1 किलो डाळ दिली जाईल.

PM Narendra Modi Speech Live 

  • प्रत्येक शेतकरी आणि करदात्याचे आभार आणि नमन : नरेंद्र मोदी
  • सर्वांनी योग्य शारीरिक अंतर ठेवा, मास्कचा उपयोग करा, निष्काळजीपणा करु नका : पंतप्रधान मोदी
  • देशाच्या प्रामाणिक करदात्यांनी कर भरल्यानेच देशातील गरीब या परिस्थितीचा सामना करु शकला, या करदात्यांचे खूप खूप आभार : पंतप्रधान मोदी
  • संपूर्ण भारतासाठी एक रेशन कार्डची व्यवस्थाही केली जात आहे, याचा उपयोग रोजगार आणि इतर राज्यात जाणाऱ्यांना होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • सण उत्सवाचा काळ येऊ घातला आहे, त्यामुळे दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत पंतप्रधान अन्नधान्य योजना, पुढील पाच महिने ८० कोटीपेक्षा जास्त व्यक्तींना प्रतिकुटुंब पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार : नरेंद्र मोदी
  • आपल्याकडे मान्सूनमध्ये फक्त कृषी क्षेत्रात सर्वात जास्त काम, जुलैपासून सणही सुरु होतात, त्यामुळे ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार, पुढील 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 1 किलो हरभरा दाळ मोफत देणार : पंतप्रधान मोदी
  • 80 कोटी लोकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले गेले, 1 किलो डाळही मोफत दिली गेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • ८० कोटीपेक्षा जास्त व्यक्तींना तीन महिन्याचे रेशन मोफत देण्यात आले, अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच पट जनतेला आपल्या सरकारकडून मोफत अन्नधान्य : नरेंद्र मोदी
  • गेल्या तीन महिन्यात 20 कोटी जनतेला 31 हजार कोटी रुपये, 9 कोटी शेतकऱ्यांना 18 हजार कोटी रुपये खात्यात जमा, मजुरांच्या रोजगारासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च केलेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • एकही गरीब कुटुंबाच्या घरात चूल पेटली नाही, अशी वेळ लॉकडाऊनच्या काळात येऊ दिली नाही, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पावणे दोन लाख कोटी रुपयांचे पॅकेज : नरेंद्र मोदी
  • देशाचं पंतप्रधान असो किंवा सरपंच हा नियमांपेक्षा मोठा नाही, सर्वांनी नियमांचे पालन करावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • अनलॉकच्या काळात जास्त खबरदारी घेणे आवश्यक, एका देशाच्या पंतप्रधानांना मास्क न लावल्याने दंड आकारला, स्थानिक प्रशासनाने अशीच उत्स्फूर्तता दाखवणे आवश्यक, कायद्यासमोर सगळे सारखे : नरेंद्र मोदी
  • जे लोक नियम पाळत नाही, त्यांना वारंवार सांगावं लागेल, आग्रह करेल, एका देशाच्या पंतप्रधानाला मास्क न घातल्याने दंड, भारतातील स्थानिक यंत्रणांना देखील असंच काम करावं लागेल : पंतप्रधान मोदी
  • लॉकडाऊनदरम्यान अनेकांनी सतर्कता दाखवली होती, मात्र आता काही जण नियमांचे पालन करत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • वेळेवर केलेल्या लॉकडाऊनने लाखोंचे जीव वाचले. अनलॉक-1 पासून थोडीसा बेजबाबदारपणा वाढतोय
  • अनलॉकनंतर वैयक्तिक खबरदारीत बेजबाबदारपणा दिसतो आहे, लॉकडाऊनमध्ये असलेली सतर्कता आत्ता दिसत नाही, हे चिंताजनक : पंतप्रधान मोदी
  • आता आपण अनलॉक 2 मध्ये प्रवेश करतोय. सर्दी, खोकल्याचेही दिवस असणारा हा हंगाम. सगळ्या देशवासियांनी काळजी घ्यावी. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी. आपला मृत्यूदर तुलनेने कमी आहे.

PM Narendra Modi Address to Nation

संबंधित बातम्या : 

Chinese Apps Ban | Tik Tok, Share IT सह चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, वाचा संपूर्ण यादी

Unlock-2 Guidelines | केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची नियमावली जारी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

Mann Ki Baat | भारत मैत्री निभावतो, तसा वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शेजाऱ्यांना उत्तरही देतो, मोदींचा थेट इशारा

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.