PM CM Meeting Live | पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसीय व्हिडिओ कॉन्फरन्स, उद्धव ठाकरेंशी दुसऱ्या दिवशी चर्चा

सर्व मुख्यमंत्र्यांना अधिक वेळ बोलता यावे, म्हणून यावेळी दोन दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (PM Narendra Modi CM Video Conference Meeting)

PM CM Meeting Live | पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसीय व्हिडिओ कॉन्फरन्स, उद्धव ठाकरेंशी दुसऱ्या दिवशी चर्चा
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 10:04 AM

PM CM Meeting Live नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी सलग दोन दिवस पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. आज (मंगळवार 16 जून) आणि उद्या (17 जून) ही बैठक होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या बातचीत होणार आहे. (PM Narendra Modi CM Video Conference Meeting)

सर्व मुख्यमंत्र्यांना अधिक वेळ बोलता यावे, म्हणून यावेळी दोन दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान आज 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद आहेत. कोरोनाचा फैलाव जादा असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदी उद्या चर्चा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उद्याच्या यादीत समावेश झाला आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि अनलॉक हा बैठकीचा अजेंडा आहे. दोन्ही दिवशी ही बैठक दुपारी 3 वाजता सुरु होईल

काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी आज चर्चा करतील. याशिवाय ज्या राज्यांमध्ये कोरोना रिकव्हरी रेट जास्त आहे, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही आजच पंतप्रधानांची चर्चा होईल. यामध्ये पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड आणि झारखंड यासारख्या राज्यांचा समावेश आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 जून रोजी पंतप्रधान मोदी ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याअगोदर पाच वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. प्रत्येक बैठकीनंतर मोदींनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे 16 आणि 17 जून रोजी होणाऱ्या बैठकींकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठका

पहिली बैठक – 20 मार्च दुसरी बैठक – 2 एप्रिल तिसरी बैठक – 11 एप्रिल (PM Narendra Modi CM Video Conference Meeting) चौथी बैठक – 27 एप्रिल पाचवी बैठक – 11 मे सहावी बैठक – 16-17 जून

(PM Narendra Modi CM Video Conference Meeting)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.