PM Modi at Nimu | जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, लडाखमध्ये पंतप्रधान मोदींचे जवानांना नमन

आत्मनिर्भर भारतचा संकल्प तुमचा त्याग आणि बलिदानामुळे आणखी मजबूत होतो, असंही नरेंद्र मोदी जवानांना संबोधित करताना म्हणाले.

PM Modi at Nimu | जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, लडाखमध्ये पंतप्रधान मोदींचे जवानांना नमन
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 2:47 PM

निमू, लडाख : “विस्तारवादाचं युग संपलं, हे युग विकासवादाचं आहे. भारत जल, वायू आणि जमीन अशा सर्व ठिकाणी शक्तीमान आहे. भारतीय जवानांच्या हातात देश सुरक्षित आहे. तुमच्या वीरतेमुळे जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडले. जवानांना देशवासियांचं नमन, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाख दौऱ्यात निमूमध्ये भारतीय जवानांना संबोधित करताना व्यक्त केल्या. (PM Narendra Modi at Nimu)

“तुमचा उत्साह आणि शौर्य, देशाच्या मान-सन्मान आणि संरक्षणासाठी तुमचं समर्पण अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत, बर्फच्छादित प्रदेशात भारतमातेची ढाल बनून संरक्षण करता, त्याची तुलना संपूर्ण जगभरात कुणाशीही होऊ शकत नाही. तुमचं धैर्य या डोंगरांपेक्षाही उंच आहे. तुमची इच्छाशक्ती आजूबाजूंच्या पर्वंताइतकी प्रबळ आहे. आज मी या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे. माझ्या डोळ्यांनी बघत आहे.” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“देशाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. त्याचबरोबर देश निश्चिंत आहे. तुम्ही सीमेवर तैनात असणं देशातील नागरिकांना काम करण्यासाठी प्रेरणा देते. आत्मनिर्भर भारताचा संकल्प तुमच्या त्याग आणि बलिदानामुळे आणखी मजबूत होतो.” असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

“तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी जी वीरता दाखवली, त्याने संपूर्ण जगाला भारताची ताकद काय आहे, ते दाखवून दिलं आहे. मी माझ्यासमोर महिला जवानांनाही बघत आहे. राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांनी लिहिलं होतं, ‘जिनके सिंहनाद से सहमी धरती रही अभी डोल, कलम आज उनकी जय बोल’. मी आज आपल्या वाणीने तुमचा विजय असो, असं म्हणतो. तुमचं अभिनंदन करतो. मी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या आपल्या वीर जवानानांही पुन्हा श्रद्धांजली अर्पित करतो.” असं मोदी म्हणाले.

“देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील वीर आपलं शौर्य दाखवत आहेत. त्यांचे पराक्रम, त्यांच्या सिंहनादाने पृथ्वी आजही त्यांचा जयघोष करत आहे. आज प्रत्येक नागरिक तुमच्या चरणी, शहीद वीरांच्या चरणी आदराने नतमस्तक होतो. सिंधूच्या आशीर्वादाने ही भूमी पवित्र झाली आहे. वीर जवानांच्या शौर्यगाथा आणि पराक्रमाला या भूमीने सामावून घेतलं आहे. लेह-लडाखपासून कारगिल ते सियाचीनपर्यंत, रेजांगलापासून गलवाना खोऱ्यापर्यंत प्रत्येत दगड, पर्वत, नद्यांचं वाहतं पाणी भारतीय जवानांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. जगाने तुमचं साहस बघितलं आहे. तुमची शौर्यगाथा घराघरात गायली जात आहे.” अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या :

PM Modi in Leh | पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा, जवानांना सातवी ‘सरप्राईझ’ भेट

PM Modi in Leh | पंतप्रधानांचा लेह-लडाख दौरा, नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे 10 महत्त्वाचे मुद्दे

PM Modi in Leh | पंतप्रधान मोदी अचानक लेह-लडाखमध्ये, कुणालाही कानोकान खबर नाही

(PM Narendra Modi at Nimu)

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.