नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान देशातील मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. शुक्रवार 19 जूनला संध्याकाळी पाच वाजता बैठकीचं आयोजन केलं आहे. (PM Narendra Modi called for all party meeting ahead of India-China Face off)
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष बैठकीत सहभागी होतील. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन याविषयी माहिती दिली. चीनसोबतच्या तणावावर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलेले नाही. त्यामुळे बैठकीपूर्वी ते काही बोलणार का, याकडे देशाचे लक्ष आहे.
In order to discuss the situation in the India-China border areas, Prime Minister @narendramodi has called for an all-party meeting at 5 PM on 19th June. Presidents of various political parties would take part in this virtual meeting.
— PMO India (@PMOIndia) June 17, 2020
चीनच्या या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला CDS प्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. (PM Narendra Modi called for all party meeting ahead of India-China Face off)
हेही वाचा : मोदीजी, आपण शूर आणि योद्धे, देश तुमच्या पाठीशी, पण सत्य काय ते बोला : संजय राऊत
दरम्यान, भारतीय जवानांना गलवान खोऱ्यात आलेलं वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे, अशा भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केल्या आहेत. सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी धाडस आणि शौर्य दाखवत देशासाठी बलिदान दिलं. जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे. दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
तिकडे चीनची गुरगुर सुरुच आहे. भारताने रुळावर यावं, गलवान आमचंच आहे, भारताने सैन्याला शिस्तीत ठेवावं, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतानेच चिथावल्याचा कांगावा चीनने अधिकृत प्रतिक्रिया देत केला आहे.
संबंधित बातम्या :
Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?
India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?
(PM Narendra Modi called for all party meeting ahead of India-China Face off)