संपर्क तुटला, संकल्प नाही, मोदींचं शास्त्रज्ञांना मनोबल, गळाभेट घेताना ‘इस्रो’ प्रमुखांचा बांध फुटला

नरेंद्र मोदींची गळाभेट घेताना इस्रोचे प्रमुख के सिवन यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सिवन यांच्या पाठीवरुन हात फिरवत मोदींनी त्यांचं सांत्वन केलं

संपर्क तुटला, संकल्प नाही, मोदींचं शास्त्रज्ञांना मनोबल, गळाभेट घेताना 'इस्रो' प्रमुखांचा बांध फुटला
Follow us
| Updated on: Sep 07, 2019 | 10:39 AM

Mission Chandrayaan 2 बंगळुरु : चंद्रयान 2 शी (Chandrayaan 2) संपर्क तुटला, तो क्षण तुमच्यासोबत मीसुद्धा जगलो आहे. डगमगून जाऊ नका, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञांचं (ISRO Scientists) मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना चंद्रयान 2 मोहिमेचं विक्रम लँडर संपर्काबाहेर (Vikram lander connection lost) गेल्याने हिरमोड झालेल्या शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्यासाठी मोदींनी त्यांची सकाळी पुन्हा भेट घेतली.

विशेष म्हणजे नरेंद्र मोदींची गळाभेट घेताना इस्रोचे प्रमुख के सिवन (ISRO Chief K Sivan) यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सिवन यांच्या पाठीवरुन हात फिरवत मोदींनी त्यांचं सांत्वन केलं. मात्र त्यावेळी मोदींच्या डोळ्यातही अश्रू तरळल्याचं म्हटलं जातं. चंद्रयान 2 मोहिमेत आलेल्या अडथळ्यामुळे शास्त्रज्ञांचे पाणावलेले डोळेही मोदींच्या भाषणावेळी पाहायला मिळाले.

तुम्ही भारतमातेसाठी झटणाऱ्या व्यक्ती आहात, तुमच्यामध्ये भारतमातेविषयी उत्कट भावना आहेत. भारतमातेची मान अभिमानाने उंचावी, यासाठी तुम्ही आयुष्य खर्ची घालता, असं म्हणत नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात केली. आज आपल्या रस्त्यात शेवटच्या पावलावर अडथळा आला असेल, मात्र आपण डगमगून जायचं नाही, धीर सोडायचा नाही, तर आणखी मजबूत करायचा, असा सल्ला मोदींनी शास्त्रज्ञांना दिला.

या मिशनशी जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती वेगळ्या अवस्थेत होती. मनात बरेच प्रश्न होते. अचानक काही दिसेनासं झालं. तो क्षण तुमच्यासोबत मीसुद्धा जगलो आहे. मात्र परिणामांनी निराश न होता लक्ष्याच्या दिशेने निरंतर पुढे जात राहण्याची आपली परंपराही आहे आणि आपले संस्कारही. चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती आणि संकल्प आज अधिक कणखर झाला आहे. कारण तुम्ही लोण्यावर रेघोट्या मारणारे नाही, तर दगडावर रेष कोरणारे आहात, अशा शब्दात मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला.

प्रत्येक संकट, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक कठीण गोष्ट आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकवते. नवीन शोध, नवीन तंत्रज्ञानाची प्रेरणा मिळते. यातून आपल्याला पुढच्या यशाचा मार्ग गवसतो. विज्ञान हा ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक आहे. विज्ञानात अपयश नसतं, तर केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतात, असंही मोदी म्हणाले.

सुरुवातीला आलेल्या अडथळ्यांवर मात करत ऐतिहासिक यश संपादन केल्याचा आपल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. खुद्द ‘इस्रो’च कधीच हार न मानणाऱ्या संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे, असंही मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांचंही अभिनंदन केलं.

संबंधित बातम्या :

Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर

चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री ‘चंद्रयान 2’चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत ‘विक्रम’ रचणार

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.