काश्मीर, अयोध्या, कट्टरतावाद आणि पुलवामा… पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातच्या केवडियामधून देशवासियांना संबोधित केलं.
केवडिया, गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातच्या केवडियामधून देशवासियांना संबोधित केलं. या संबोधनात त्यांनी काश्मीर, अयोध्या, कट्टरतावाद पुलवामा आदी विषयावर भाष्य केलं. (Pm Narendra Modi Speech At kevadiya)
जगातील सर्वांना दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज
संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधात एकत्र यायला हवं, दहशतवादाला कडाडून विरोध करायला हवा
दहशतवाद आणि हिंसाचाराने कोणत्याच देशाचं भलं होणार नाही
पुलवामा हल्लासंदर्भात विरोधी पक्ष राजकारण करत होता. भारताचे 40 जवान शहीद झाल्यावरही त्यांना दुख झालं नव्हतं
पुलवामा हल्ल्यादरम्यान देशात अहंकारी राजकारण सुरू होते. त्यावेळी केली गेलेली विधानं देश विसरू शकत नाही.
राष्ट्रावर पुलवामासारखा प्रसंग ओढावलेले असतानाही स्वार्थी आणि अहंकारी राजकारण केले गेले, ते देश कधीही विसरणार नाही
इथून पुढे सुरक्षा दलाच्या मनोबलावर परिणाम होईल, असं राजकारण कुणी करण्याचा प्रयत्न करु नये
शांतता, बंधुता आणि परस्पर आदर यांची भावना ही मानवतेची खरी ओळख, कट्टरतावाद मानवजातीला घातक
भारत सार्वभौमत्वाच्या आणि सन्मानाच्या संरक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आणि सज्ज
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांनी दिलेल्या ऐक्याच्या संदेशामुळे आम्हाला कोरोनासारख्या संकटाशी 8 महिने लढण्याचे सामर्थ्य मिळाले
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौर्याचा आज दुसरा दिवस आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी केवडिया येथे पोहोचले, त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला श्रद्धांजली अर्पण केली.
Kevadia: Prime Minister Narendra Modi witnesses ‘Rashtriya Ekta Diwas’ parade on the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel#Gujarat pic.twitter.com/8BJRrLrE8Z
— ANI (@ANI) October 31, 2020
संबंधित बातम्या
पुलवामा हल्ल्यादरम्यान देशात अहंकारी राजकारण सुरू होते; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
(Pm Narendra Modi Speech At kevadiya)