गेल्या शतकातील कायद्यांनी राष्ट्रनिर्माण अशक्य, पंतप्रधानांचे कृषी कायद्यांवर अप्रत्यक्ष भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ केला. गेल्या शतकातील कायद्यांनी राष्ट्रनिर्माण शक्य नाही, असं म्हणत यावेळी पंतप्रधानांनी कृषी कायद्यांवर अप्रत्यक्ष भाष्य केलं. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन पेटलं असून विरोधकांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आग्रा मेट्रो रेल (Agra Metro Rail) 29.4 किमी लांब असून त्यात दोन कॉरिडोर असतील. ताज ईस्ट गेटपासून सिकंदरापर्यंत 14 किमी मार्गावर 13 मेट्रो स्टेशन असतील. (PM Narendra Modi talks on Agriculture laws amid farmer protest)
पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
- मेक इन इंडिया अंतर्गत आता मेट्रो कोचही भारतात तयार करण्यात येत आहेत. भारतात सिग्नल सिस्टीमही पूर्णपणे तयार केली जात आहेत. भारत मेट्रोमध्येही आत्मनिर्भर आहे. 2014 नंतर सहा वर्षांत देशात 450 किमीपेक्षा जास्त लांबीच्या मेट्रो मार्गिका देशभरात कार्यरत आहेत. सुमारे एक हजार किलोमीटर मेट्रो लाइनचे काम सुरु आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता कोरोना लस मिळवण्यासाठी आपल्याला फार काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे वाटत नाही. परंतु तोपर्यंत प्रत्येकाला मास्क आणि दोन गज अंतराचा नियम पाळावा लागेल.
- कायदे एका ठराविक काळानंतर ओझी होतात. गेल्या शतकातील कायदे राष्ट्र निर्माण करणार नाहीत.
- शहरांच्या विकासासाठी आम्ही चार स्तरांवर काम सुरु केले आहे. भूतकाळापासून सुरु असलेल्या समस्यांचे निराकरण, जीवन अधिक सुलभ करणे, गुंतवणूक वाढावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर झाला पाहिजे.
- रिअल इस्टेट क्षेत्राच्या परिस्थितीशी आपण परिचित आहोत. बिल्डर आणि गृह खरेदीदार यांच्यात विश्वासाचे अंतर आले होते. काही व्यक्तींनी मध्यमवर्गाला त्रास देऊन संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राला बदनाम केले. ही समस्या दूर करण्यासाठी रेरा कायदा आणला गेला. अलिकडच्या अहवालांनुसार या कायद्यानंतर मध्यमवर्गीयांची घरं वेगाने पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे.
- पायाभूत सुविधा क्षेत्राची एक मोठी समस्या म्हणजे नवीन प्रकल्प जाहीर तर होतात, परंतु आर्थिक स्त्रोतांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आमच्या सरकारने नवीन प्रकल्प सुरु करण्यासोबतच आवश्यक निधीची तरतूद करण्याची काळजी घेतली.
- नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाइन प्रकल्पांतर्गत 100 लाख कोटींपेक्षा जास्त खर्च करण्याची योजना आहे. देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जगभरातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.
- मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅनवरही काम केले जात आहे. देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जगभरातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.
- आधुनिक सुविधा आणि आधुनिक कनेक्टिव्हिटीमुळे उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची क्षमता आणखी वाढत आहे. मेरठ ते दिल्ली दरम्यान देशातील पहिली वेगवान रेल्वे वाहतूक व्यवस्था तयार केली जात आहे. दिल्ली-मेरठ दरम्यान 14 पदरी एक्सप्रेस वे लवकरच नागरिकांच्या सेवेत असेल
- माझे नेहमीच मत आहे की पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे ज्यात प्रत्येकासाठी कमाईची साधने आहेत. मला आशा आहे की कोरोनाची परिस्थिती जसजशी सुधारत आहे, तसतसे लवकरच पर्यटन क्षेत्रही परत रुळावर येईल.
PM @narendramodi inaugurates the construction work of Agra Metro project through video conference
The project will benefit the 26 lakh population of the city and will also cater to more than 60 lakh tourists who visit Agra every year.
- (PM Narendra Modi talks on Agriculture laws amid farmer protest)
Details: https://t.co/526mBDjFpp pic.twitter.com/fcZgPW2VuI
— MIB India ?? #StayHome #StaySafe (@MIB_India) December 7, 2020
संबंधित बातम्या :
‘संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व’, सशस्त्र सेना झंडा दिनी पंतप्रधान मोदींकडून जवानांना सलाम
(PM Narendra Modi talks on Agriculture laws amid farmer protest)