मतदानाआधीच भाजपला पुन्हा सत्तेचा विश्वास, पीएमओकडून कामालाही सुरुवात?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएची सत्ता पुन्हा येऊ शकते हे गृहीत धरुन पंतप्रधान कार्यालयाने पुढील 100 दिवसांच्या योजना आखायलाही सुरुवात केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, पंतप्रधान कार्यालयाने 100 दिवसांची योजना तयार करण्यासाठी सर्व मंत्रालयातील विशेष योजनांचा आलेख लवकरात लवकर पीएमओला सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मतदान होण्याअगोदरच पुन्हा सत्तेत […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएची सत्ता पुन्हा येऊ शकते हे गृहीत धरुन पंतप्रधान कार्यालयाने पुढील 100 दिवसांच्या योजना आखायलाही सुरुवात केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, पंतप्रधान कार्यालयाने 100 दिवसांची योजना तयार करण्यासाठी सर्व मंत्रालयातील विशेष योजनांचा आलेख लवकरात लवकर पीएमओला सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मतदान होण्याअगोदरच पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपला विश्वास असल्याचं बोललं जातंय.
पीएमओच्या सूचनेनंतर सर्व मंत्रालयातील अधिकारी कामाला लागले आहेत. सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. पहिल्या टप्प्यातीलही मतदान अजून झालेलं नाही. तरीही पुढील 100 दिवसांची योजना सुरु आहे, जेणेकरुन सत्ता आल्यास पुन्हा योजना तयार करण्यात वेळ जाऊ नये. या 100 दिवसांच्या योजनांमध्ये ग्रामीण आणि शहरी रोजगाराचा समावेश आहे. 2014 ला सत्ता मिळाल्यानंतर योजना तयार करण्यातच अनेक महिने गेले होते. त्यामुळे सरकारने आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे सजिव प्रणव झा यांनी मोदी सरकारच्या या हालचालींवर टीका केली आहे. सरकार येण्याच्या आधीचं हे पाऊल आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. पण मोदी सरकारने आता जनतेचा विश्वास केलाय, त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षात बसण्यासाठी तयार रहावं, असं झा यांनी म्हटलंय. कितीही योजना आखल्या तरी त्याचा फायदा मोदी सरकारला होणार नाही. नोटाबंदीने बेरोजगारी वाढवली. याआधीही अनेक योजना केल्या, पण त्याचा फायदा झाला नाही, असं ते म्हणाले.
केंद्रात कुणाची सत्ता येणार याचा निर्णय 23 मे रोजी होणार आहे. पण त्याअगोदरच मोदी सरकार पुढील वेळ वाचवण्याच्या तयारीला लागलंय. याचाच अर्थ, पुन्हा सत्ता येण्याचा भाजपला विश्वास आहे.