संपत्तीच्या वादातून दत्तकपुत्रानं केला बापाचा खून, सर्पदंशाची उडवली अफवा, बुलडाण्यातील घटना
संपत्तीच्या वादातून वडिलांचा गळा आवळून खून करणाऱ्या दत्तकपुत्राला शेगाव पोलिसांनी अटक केलीय. दत्तकपुत्रानं खून करुन सर्पदंश झाल्याची अफवा पसरवली होती.

बुलडाणा : दत्तकपुत्र म्हणून स्वीकारलेला बाप शेतात हिस्सा देत नाही. पत्नीच्या दवाखाण्यासाठी पैसे देत नाही. हा राग मनात ठेऊन सोपान दळभंजन या दत्तकपुत्राने वडिल निवृत्ती दळभंजन यांना शेतात गळा आवळून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. अकोला वैद्यकीय महाविद्यालयाने एका महिन्यानंतर दिलेल्या फॉरेन्सिक अहवालातून दळभंजन यांचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आले. या अहवालानंतर बुलडाणा जिल्ह्यातील सगोडा गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. निवृत्ती दळभंजन यांनी सोपान दळभंजन या पुतण्याला मागील वर्षी दत्तक घेतले होते. (Adopted son murdered father for property)
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सगोडा गावातील शेतकरी निवृत्ती पुंडलीक दळभंजन, वय ४५ वर्ष यांना सोपान दळभंजन याने ४ सप्टेंबर रोजी शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी सोपान यानं वडिलांना सर्पदंश झाल्याचे आणि त्यामुळे हार्ट अटॅक आल्याचे सांगितले होते. डॉक्टरांनी यावेळी तपासणी केल्यानंतर निवृत्ती दळभंजन हे रुगणालयात दाखल होण्यापूर्वी मरण पावल्याचे सांगितले. यांनतर शवविच्छेदन झाल्यानंतर दळभंजन यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते.
अकोला वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक तज्ञांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालात मृत दळभंजन यांना दोरीच्या साहायाने ठार मारले असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसंनी दत्तकपुत्राला ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता आपणच संपत्तीच्या वादातून बापाचा खून केल्याची कबुली दिलीय. शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी दत्तकपुत्र सोपान दळभंजन याला अटक करत खुनाचा गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती शेगाव ग्रामीणचे ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.
सोपान दळभंजनने वडिलांना शेतात सर्पदंश झाला असून त्यामुळे हार्ट अटॅक आला, असे भासवले होते. नातेवाईकांसह गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना खोटी माहीती दिली होती.मात्र,फॉरेन्सिक अहवालानंतर त्याचा बनाव उघडकीस आला आहे.
संबंधित बातम्या :
40 रुपयांसाठी मित्राचा गळा दाबला; तरुणाचा गुदमरुन मृत्यू, कोल्हापुुरातील धक्कादायक घटना
ATM फोडणाऱ्या टोळीकडे ट्रक सापडला, पोलीस हैराण, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
(Adopted son murdered father for property)