पोलिसांचे हात दुखले; मुख्याध्यापकांना सांगितले; रस्त्यावर येणाऱ्यांना हाणा

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात चापोली येथे लाठीचार्ज करुन करुन पोलिसांचे हात दुखत असल्याने पोलिसांनी एका मुख्याध्यापकांनाच लाठीचार्ज करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे (Lathicharge by school principal in Latur).

पोलिसांचे हात दुखले; मुख्याध्यापकांना सांगितले; रस्त्यावर येणाऱ्यांना हाणा
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 10:50 PM

लातूर : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आणि संचारबंदीदरम्यान पोलिसापुढे नागरिकांना घरातच रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागत आहे. मात्र, लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात चापोली येथे लाठीचार्ज करुन करुन पोलिसांचे हात दुखत असल्याने पोलिसांनी एका मुख्याध्यापकांनाच लाठीचार्ज करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे (Lathicharge by school principal in Latur). याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दत्ता कुलकर्णी असं या मुख्याध्यापकांचं नाव आहे. ते चापोली येथील स्वामी विवेकानंत विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. तर सुभाष हरणे असं संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनीच लाठीचार्ज करण्याची परवानगी दिल्याने मुख्याध्यापक दत्ता कुलकर्णी यांनी देखील रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांना जोरदार चोप दिला. त्यांनी अगदी पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे संचारबंदीत वाहतूक करणाऱ्या किंवा ये-जा करणाऱ्या लोकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. पोलिसही शेजारी उभे राहून संबंधित मुख्याध्यापकांना मारहाण करण्यास प्रोत्साहन देत होते. ते कसलंही म्हणणं ऐकून न घेता मारहाण करत होते, असा आरोप करण्यात आला आहे. याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात हे स्पष्टपणे दिसत आरहे.

देगलूर (जि. नांदेड) येथून जीवनावश्यक वस्तू घेऊन गेलेला ट्रक चालक परतत असताना त्यालाही चापोलीत या मुख्याध्यापकांनी बेदम मारहाण केली. यावेळी तेथे पोलिसही हजर होते. पोलिसांना अधिकार नसलेल्या इतर दुसऱ्या व्यक्तींच्या हातात काठी देऊन मारायला सांगण्याचा अधिकार कुणी दिला, असाही प्रश्न काही लोक विचारत आहेत. तसेच लातुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन मुख्याध्यापक आणि संबंधित पोलिस कर्मचारी हरणे यांच्यावर कारवाही करावी, अशीही मागणी होत आहे.

सुरुवातीला संबंधित मुख्याध्यापक पोलिसच असल्याचा अनेकांचा भास झाला. मात्र, नंतर ते एका शाळेचे मुख्याध्यापक असल्याचं समोर आलं. तसेच पोलिस कर्मचाऱ्याने आपले हात दुखत असल्याने त्यांची मदत घेत त्याना काठी देत लाठीचार्ज करायला लावल्याचं समोर आलं. आता आपले हात दुखत असल्याने अन्य व्यक्तीला मारहाण करायला सांगणारी ही लातूरची घटना सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

ज्यांचा पगार 30 हजारांच्या खाली, त्यांना दोनवेळा पगार; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अंबानींचं दिलदार पाऊल

कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह पत्रकार, तब्बल 200 पत्रकार आणि राजकारण्यांची उपस्थिती

80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Corona | भारतात फक्त 27 टक्के नागरिक घरात लॉकडाऊन, सर्व्हेत धक्कादायक माहिती

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन, सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

Lathicharge by school principal in Latur

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....