श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमधील चकमक काही नवी नाही. मात्र या दहशतावादी हल्ल्याचं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य समोर आलं आहे. दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद आणि तीन जण जखमी आहेत. दुर्दैवी म्हणजे एका नागरिकाचाही मृत्यू झाला. मात्र त्या नागरिकाचा चिमुकला नातू, आपल्या आजोबाच्या मृतदेहावर बसून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होता. (Jammu Kashmir three year boy rescued)
Police rescued a 3-year-old boy from getting hit by bullets during the terrorist attack in Sopore: Jammu & Kashmir Police https://t.co/T5hGdXkRAs pic.twitter.com/JaoSjrzsOD
— ANI (@ANI) July 1, 2020
अंगावर काटा आणणारं, हृदय पिळवटून टाकणारं हे दृश्य काश्मीर खोऱ्यात पाहायला मिळालं. जम्मू काश्मीरमधील सोपोर भागात दहशतवाद्यांनी बुधवारी सकाळी CRPF च्या पथकावर हल्ला केला. मार्केट परिसरात हा भाग आहे. या हल्ल्यात सीआरपीएफ 179 बटालियनचा एक जवान शहीद झाला. तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला.
#WATCH Jammu & Kashmir Police console a 3-year-old child after they rescued him during a terrorist attack in Sopore, take him to his mother. The child was sitting beside his dead relative during the attack. pic.twitter.com/znuGKizACh
— ANI (@ANI) July 1, 2020
हा नागरिक 60 वर्षाचा वृद्ध होता. घटनास्थळावरुन जो फोटो समोर आला आहे तो दाहकता दाखवून देणारा आहे. जमिनीवर मृतदेह पडला असून, कपडे रक्ताने माखले आहेत. त्या नागरिकाचा 3 वर्षाचा नातू आपल्या आजोबाच्या अंगावर बसला होता.
J&K: A Central Reserve Police Force (CRPF) jawan & a civilian lost their lives, & 3 CRPF personnel injured after terrorists fired upon a CRPF patrolling party in Sopore, today. According to CRPF, 2 of the injured CRPF jawans are critical. (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/dLHapPsSJa
— ANI (@ANI) July 1, 2020
हे चित्र समोर असताना, बाजूला अतिरेक्यांवर निशाणा धरुन बसलेला भारताचा जवान, त्या चिमुकल्याला आपल्याकडे बोलावून घेत होता. नंतर जवानाने त्या चिमुकल्याला आपल्या कडेवर घेतलं.
(Jammu Kashmir three year boy rescued)
संबंधित बातम्या
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचा एक जवान शहीद