आधी कोरोनाचा कहर, आता पावसाचा अंदाज, पुढील पाच दिवसात गारपिटीसह पावसाचे संकेत

वातावरण बदलामुळे पुढील 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यातही पावसाचा अंदाज आहे (Possibility of rain in Maharashtra).

आधी कोरोनाचा कहर, आता पावसाचा अंदाज, पुढील पाच दिवसात गारपिटीसह पावसाचे संकेत
Follow us
| Updated on: Mar 24, 2020 | 7:32 PM

पुणे : वातावरण बदलामुळे पुढील 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यातही पावसाचा अंदाज आहे (Possibility of rain in Maharashtra). अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच अनेक भागात वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ऐन पीक काढण्याच्या काळात होणारा हा बेमोसमी पाऊस पिकांचं मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे.

कोकणात पुढील 6 दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मुंबईत 27 आणि 28 मार्चला काही ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्रात चार-पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल‌‌. सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल‌. शिवाय दोन दिवस गारपीटीचीही शक्यता आहे. विदर्भात 25 ते 28 मार्चच्या दरम्यान हलक्‍या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण राहील. 30 मार्चपर्यंत हे ढगाळ वातावरण राहील. मंगळवारपासून काही ठिकाणी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. त्याच बरोबर वादळ वाराही असेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे हवामान विभाग प्रमुख डॉ अनूप कश्यपी यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात आणता येत नाही. त्यातच आता पुढील 5 दिवस हवामान विभागानं राज्यात सर्वत्र कमी-अधिक स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होणार आहे. कोरोना व्हायरस पाठोपाठ शेतकऱ्यांवर अवेळी पावसाचंही संकट आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच शेतातील पिकाला बाजारपेठा बंद असल्याने विकता येईना. त्यात आता पावसानेही हजेरी लावल्यास शेतकऱ्याला एकाचवेळी अस्मानी आणि सुल्तानी संकटाला समोरं जावं लागणार आहे.

संबंधित बातमी :

संकट मोठं, समजुतदारपणा वाढवा, मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती

पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद, गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

Possibility of rain in Maharashtra

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.