पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage).

पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 9:07 AM

पुणे : यंदा पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage). धरण प्रकल्पातील चारही धरणात यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने 12 दिवसांमध्ये धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मात्र, मागीलवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी कमीच आहे.

असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळू शकते. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. तर दौंड इंदापूर आणि बारामतीला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र पावसाचं प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. अशास्थितीत पाणी कमी असल्याने खरीप हंगामासाठी या पाणी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडता आलं नाही.

गेल्यावर्षी 4 धरणांमध्ये एकूण 16.74 टीएमसी म्हणजेच 57.43 टक्के पाणीसाठा होता. सद्य परिस्थितीत चारही धरणातील पाणीसाठा 9.86 टीएमसी म्हणजेच 33.82 टक्के आहे. खडकवासला 41.01 टक्के, पानशेत 39.95 टक्के, वरसगाव 31.77 टक्के, टेमघरमध्ये 19.44 टक्के पाणी साठी आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. मात्र, हा निर्णय ऑगस्टमध्ये किती पाऊस होतो यावरच ठरणार आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोनाच्या स्थितीत काहीशी सुधारणा होत आहे. पुण्याचा मृत्यूदर घटला असून 25 जुलै रोजीच्या महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार पुण्याचा मृत्यूदर हा मुंबईपेक्षा कमी, तर भारतापेक्षा जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर 2.45 टक्के, मुंबई 5.59 टक्के इतका आहे. तर महाराष्ट्राचा 3. 65 टक्के आणि भारताचा 2.32 टक्के इतका मृत्यूदर आहे.

पुण्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 66 वर पोहचली आहे. यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27 हजार 418 इतकी आहे. सध्या पुण्यात 18 हजार 494 सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी

Pune Water Shortage

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.