देवसेनासोबतच्या अफेअरबाबत बाहुबलीने कन्फ्युज केलं!
मुंबई: बाहुबली अर्थात दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि देवसेना अर्थात अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा आहे. बाहुबली सिनेमाच्या यशापासून तर या चर्चेने जोर धरला आहे. प्रभास हा दक्षिणेकडील लोकप्रिय चेहरा. अनुष्का शेट्टीनेही दक्षिणेकडील सिनेसृष्टी गाजवली आहे. या दोघांनी बाहुबली सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या, तेव्हापासून या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाली. मात्र या चर्चेवर […]
मुंबई: बाहुबली अर्थात दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि देवसेना अर्थात अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा आहे. बाहुबली सिनेमाच्या यशापासून तर या चर्चेने जोर धरला आहे. प्रभास हा दक्षिणेकडील लोकप्रिय चेहरा. अनुष्का शेट्टीनेही दक्षिणेकडील सिनेसृष्टी गाजवली आहे. या दोघांनी बाहुबली सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या, तेव्हापासून या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाली. मात्र या चर्चेवर पहिल्यांदाच प्रभासने प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये लवकरच प्रभास दिसणार आहे. या एपिसोडचा प्रोमो सध्या रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये बाहुबली भाग-1 आणि बाहुबली भाग-2 चे निर्माते राजामौली, अभिनेते राणा दग्गुबती आणि प्रभास हे करण जोहरसोबत धमाल करताना दिसत आहेत.
Leave it to @karanjohar to ask these perfect gentlemen, the perfectly wrong questions on #KoffeeWithKaran. #KoffeeWithTeamBaahubali pic.twitter.com/EKl7cgkemD
— Star World (@StarWorldIndia) December 16, 2018
या प्रोमोमध्ये करणने प्रभासला काही प्रश्न विचारले आहेत.
करण – तू कुणाला डेट करतो आहेस का?
प्रभास – नाही.
करण – तुझ्या आणि अनुष्काच्या डेटिंगच्या अफवा खऱ्या आहेत का?
प्रभास – याची सुरुवात तिने(अनुष्काने) केली.
करण – तू कॉफी विथ करणमध्ये खोटं बोलला आहेस का?
प्रभास – हो
प्रभासने दिलेली उत्तरं त्याच्या चाहत्यांना कन्फ्युज करत आहेत. कारण एकीकडे तर प्रभासने त्याच्या आणि अनुष्काच्या अफेरला नाकारले, तर दुसरीकडे याची सुरुवात अनुष्काने केल्याचं सांगितलं.
बाहुबलीच्या यशानंतर प्रभास आता त्याच्या ‘साहो’ सिनेमाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते साहो सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा येत्या वर्षात म्हणजेच 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.