वीज बिल भरु नका, प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

बिलं भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

वीज बिल भरु नका, प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 4:40 PM

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे. लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी कालच सांगितलं होतं. (Prakash Ambedkar appeals not to pay Electricity Bill)

लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल भरु नये, असं आवाहन केलं आहे. बिलं भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

राज्यातील वीज ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला होता, तो कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला, याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखवल्याने आणि वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे, असा घणाघाती आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केला आहे.

भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली होती. कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये 59 हजार 102 कोटींवर पोहोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोहोचली, तर वाणिज्य ग्राहकांची थकबाकी 879 कोटींवरुन 1241 कोटींवर आणि औद्योगिक ग्राहकांची थकबाकी 472 वरुन 982 कोटींवर पोहोचली, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

(Prakash Ambedkar appeals not to pay Electricity Bill)

संबंधित बातम्या :  

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु

Pravin Darekar | वीज बिल माफीच्या आश्वासनाचे काय झालं? प्रवीण दरेकरांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

(Prakash Ambedkar appeals not to pay Electricity Bill)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.