मेगाभरती थांबवा, आम्ही मराठा समाजासोबत, मात्र OBC मधून त्यांना आरक्षण नको : प्रकाश शेंडगे

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात वाद निर्माण केला जात आहे," असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले. (Prakash Shendge On OBC And Maratha Reservation Issue) 

मेगाभरती थांबवा, आम्ही मराठा समाजासोबत, मात्र OBC मधून त्यांना आरक्षण नको : प्रकाश शेंडगे
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 2:20 PM

मुंबई : “जे मराठा समाजाला दिलं जात आहे, तसे लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत. मात्र OBC मधून त्यांना आरक्षण नको,” अशी भूमिका माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ओबीसी समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. (Prakash Shendge On OBC And Maratha Reservation Issue)

“ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी काही नेते करत आहेत. या मागणीमुळे ओबीसी समाजात जे छोटे समाज ते भयभीत झाले आहेत. त्यामुळे हे सर्व चुकीचे सुरू आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात वाद निर्माण केला जात आहे,” असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले.

“त्या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन केलं जाणार आहे. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात येणार असून त्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या टप्पातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालय समोर केले जाईल, ज्याची तारीखनंतर जाहीर केली जाईल,” असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले.

“आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत”

तसेच मराठा समाजाला जे लाभ दिलं जात आहे, ते आणि तसेच लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत, अशीही आमची मागणी आहे. त्याशिवाय राज्यात सद्यस्थितीत सुरु असलेली मेगाभरती थांबवली पाहिजे, अशीही आमची मागणी आहे. आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत. ओबीसीला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमी केली आहे, असेही प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले.

दरम्यान सर्वांचे आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण देण्याची मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्विग्न भावनेतून केली असावी, असे मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले होतं. राज्यातील मागासवर्गीय समाज व बारा बलुतेदारांचा जीवनासाठी संघर्ष अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करुन चालणार नाही, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले होते. (Prakash Shendge On OBC And Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

धनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.