Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा प्रसाद दुतावासांमार्फत जगभर वाटणार, अयोध्येत 1 लाख 11 हजार लाडूंची तयारी
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार (Ram Temple Laddu) आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे.
लखनऊ (उत्तर प्रदेश) : अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार (Ram Temple Laddu) आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. राम मंदिराच्या पूजेसाठी मणिराम दास यांच्या छावणीकडून तब्बल एक लाख 11 हजार लाडू तयार केले जात आहेत. हे तयार करण्यात येणारे लाडू दुतावासांमार्फत जगभारत पाठवले जाणार आहेत (Ram Temple Laddu).
“अयोध्येत लाडू नैवेद्य आणि प्रसाद वाटण्यासाठी 1 लाख 11 हजार लाडू तयार करण्यात येत आहे”, असं तेथील एका सेवकाने सांगितले.
“हे तयार करण्यात येणारे लाडू जगभरात, मठ-मंदिरात पाठवले जाणार आहे. या लाडूंचे नैवेद्य दाखवले जाईल. नैवेद्य दाखवल्यानंतर हे लाडू सर्व मठ-मंदिरात पाठवले जातील. तसेच येथील भक्तांमध्येही लाडू वाटले जाईल”, असंही सेवकाने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. अयोध्येत 500 वर्षांनी येणाऱ्या या दिवसाला एक विशेष दिवस बनवण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून दिवाळीसारखे वातावरण तयार करण्यात येत आहे.
अयोध्येत या निमित्ताने शरयू आरतीसाठी गर्दी वाढत आहे. ट्रस्टकडून लाडूंचे एक लाख पॉकेट वाटले जात आहे. तर दुसरीकडे दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा आणि बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या देशांच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांच्या सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
“राम जन्मभूमी कॅम्पसमध्ये पंडितांची एक टीम 3 ऑगस्टला अनुष्ठान आणि पूजेचा कार्यक्रम सुरु करणार आहे. 3 ऑगस्टला गणेश पूजेसह उत्सव सुरु केला जाईल”, असं राम जन्मभूमी तीर्क्ष क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले.
“अयोध्येत 5 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून पूजन आणि अनुष्ठान सुरु होईल. काशीच्या विद्वान 11 पंडितांच्या टीमकडून हे पूजन केले जाईल. हीच टीम नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करणार आहे”, असंही मिश्रा यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
राम मंदिराचे भूमिपूजन पक्षाचे नाही, तर राम भक्तांचे, विनायक राऊतांचा टोला