मुंबई : प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला. कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञांना मदतीचा हात दिल्याबद्दल दामलेंचा गौरव करण्यात आला. (Prashant Damle Subhash Ghai among COVID Warriors felicitated by Governor Bhagat Singh Koshyari at Rajbhavan)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन पुकारल्यामुळात कलाविश्वातील कामही बंद होते. त्यामुळे हातावर पोट असलेल्या पडद्यामागील कलाकारांची गैरसोय झाली. आर्थिक चणचणीतून अनेक कलाकारांना दैनंदिन जीवनातही संकटाचा सामना करावा लागला होता. अभिनेते प्रशांत दामले यांनी ही निकड लक्षात संकट काळात पडद्यामागील कलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला होता.
नाट्य व्यवसायावर आलेले संकट लक्षात घेऊन प्रशांत दामले यांनी पडद्यामागील तंत्रज्ञांना आर्थिक मदत केली होती. 23 जणांना त्यांनी चेक वाटप करत संसार सावरण्यास हातभार लावला होता. संकट काळात जपलेलं सामाजिक भान लक्षात घेऊन त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांच्यासह कोरोना काळात विविध क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या 45 कोरोना योद्ध्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉय, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरवणाऱ्या दानशूर व्यक्तींनाही गौरवण्यात आले. ‘स्पंदन आर्ट’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Prashant Damle Subhash Ghai among COVID Warriors felicitated by Governor Bhagat Singh Koshyari at Rajbhavan)
अभिनेते प्रशांत दामले,
निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांसह समाजाच्या विविध क्षेत्रात करोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या करोना योद्ध्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. pic.twitter.com/zSjYrfRQwx— Governor of Maharashtra (@maha_governor) November 1, 2020
संबंधित बातम्या :
बॅकस्टेज आर्टिस्ट, मेक अप, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज यांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघाचा पुढाकार
रंगमंच कामगारांच्या लॉकडाऊन मदतनिधीमध्ये घोटाळ्याचा आरोप
(Prashant Damle Subhash Ghai among COVID Warriors felicitated by Governor Bhagat Singh Koshyari at Rajbhavan)