मुख्यमंत्र्यांचा दौरा रेड कार्पेटवर, फडणवीस आणि मी चिखलातून शेतकऱ्यांच्या बांधावर, दरेकरांचं टीकास्त्र

"मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल, तर त्यांनी घरातच बसावं. मात्र शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करावी" अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली

मुख्यमंत्र्यांचा दौरा रेड कार्पेटवर, फडणवीस आणि मी चिखलातून शेतकऱ्यांच्या बांधावर, दरेकरांचं टीकास्त्र
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 11:16 AM

सांगली : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रेड कार्पेटवर उभे राहून पाहणी दौरा करत आहेत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जात चिखलात उभे राहून थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत” अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. (Pravin Darekar says CM Uddhav Thackeray visits on Red Carpet during Rain Affected areas Visit)

“मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल, तर त्यांनी घरातच बसावं. मात्र शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी” अशी मागणी यावेळी प्रवीण दरेकरांनी केली. प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला.

“एकीकडे शरद पवार म्हणतात पंचनामे आणि प्रक्रिया करायला वेळ लागेल आणि दुसरीकडे म्हणतात केंद्र सरकारने तातडीची मदत घ्यावी, म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जात आहे, राजकीय दृष्टीकोन बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीचे निर्णय घेणे गरजेचे आहे” असेही दरेकर म्हणाले.

“केवळ केंद्र सरकारवर बाजू ढकलून राज्य सरकारमधील नेते राजकारण करत आहेत. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा” अशी अपेक्षा प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली.

राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. याआधी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचाही दौरा केला होता.

संबंधित बातम्या :

तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर शेतकऱ्याला काय मदत करणार? : प्रवीण दरेकर

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

(Pravin Darekar says CM Uddhav Thackeray visits on Red Carpet during Rain Affected areas Visit)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.