Maratha Reservation | EWS अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या, प्रवीण गायकवाडांचा सल्ला

मराठा समाजाला एसइबीसी नुसार आरक्षण मिळणे शक्य नाही, त्यामुळं EWS अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली. (Pravin Gaikwad advice on Maratha Reservation)

Maratha Reservation | EWS अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या, प्रवीण गायकवाडांचा सल्ला
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 8:19 PM

पुणे- मराठा समाजाला एसइबीसी नुसार आरक्षण मिळणे शक्य नाही, त्यामुळं EWS अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली. पुणे येथे पत्रकार परिषद घेत प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडची  मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. (Pravin Gaikwad advice maratha community take advantages of EWS)

मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे नेते या विषयाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याची टीका प्रवीण गायकवाडांनी केली. आंदोलनामुळे समाजातील तरुणाईचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आता ते सगळं थांबवून जागतिकीकरणाचे लाभ घेण्याची मानसिकता बाळगणं गरजेचं आहे, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

मराठा समाजाला तत्कालीन राज्य सरकारने एसईबीसीमध्ये 16 टक्के आरक्षण दिले. उच्च न्यायालयाने त्यामध्ये कपात करत ते 12 टक्क्यांवर आणत मराठा आरक्षण कायम ठेवले. 40 वर्षांचा आरक्षणाचा लढा लढलो. मराठा आरक्षणची मूळ मागणी आर्थिक निकषावर करण्यात आली होती. सर्व मराठा संघटनांना, समाजाला आणि राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी एसईबीसीच्या आडून EWS आरक्षण थांबवू नये. सामाजिक न्यायाची भूमिका लक्षात घेऊन मराठा समाजाला राज्यात आणि केंद्रात EWS आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका प्रवीण गायकवाड यांनी मांडली.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत EWS अंतर्गत सवलत नको, अशी भूमिका मांडली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला EWS मध्ये मिळणाऱ्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर सारथी संस्थेला निधी देण्याची घोषणा केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झालाय. राज्यात मराठा समाजाकडून विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 3 ऑक्टोबरला पुणे येथे बैठक होत आहे.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणाची ओवाळणी द्या, बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर बहिणीचा ठिय्या

मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

(Pravin Gaikwad advice maratha community take advantages of EWS)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.