कोरोना’बाबत गरोदर महिलांनी घ्यायची काळजी!

करोनाग्रस्तांची संख्या देशात वाढत असल्यामुळे प्रत्येकाला आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी लागली (Pregnant women health tips)  आहे.

कोरोना’बाबत गरोदर महिलांनी घ्यायची काळजी!
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 1:51 PM

मुंबई : करोनाग्रस्तांची संख्या देशात वाढत असल्यामुळे प्रत्येकाला आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी लागली (Pregnant women health tips)  आहे. त्यात घरात एखादी महिला गरोदर असेल तर ही काळजी चिंता बनणं, साहजिकच आहे.

‘सेंटर फार डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’च्या मते, गरोदर महिला या कोणत्याही प्रकारच्या श्वसनाशी संबंधित संक्रमणांना अधिक संवेदनक्षम असतात आणि त्यामुळेच फ्ल्यूसारखे आजार इतर व्यक्तींच्या तुलनेत गरोदर महिलांसाठी अधिक घातक ठरू (Pregnant women health tips) शकतात. गरोदर महिलांमधील रोगप्रतिकारक व्यवस्थेत बदल घडतात, तसंच फुफ्फुसं आणि ह्रदय यांवरही परिणाम होत असतो, त्यामुळे असं होत असावं.

सगळीकडे कोरोनाने थैमान घातलं असताना गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गरोदर महिलांना असुरक्षित प्रवर्गात टाकणं, ही एक धोक्याची घंटा आहे आणि ती गांभीर्याने घ्यायला हवी. आपल्याला माहितच आहे की, काही विषाणूजन्य संक्रमणांचे गंभीर दुष्परिणाम गरोदर महिलांवर होतात. त्यामुळेच गरोदर महिलांनी आवश्यक ती खबरदारी घेणं आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. धोका कमी कसा करता येईल?

कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणं दिसत असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळा.

नियमित हात धुवा.

अन्न योग्य पद्धतीने शिजवून खा. आरोग्यदायी, जीवनसत्वयुक्त पदार्थच खा.

तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणीही खोकताना तसंच शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. वापर झाल्यावर हा टिश्यू पेपर कचऱ्याच्या डब्यात टाका आणि हात स्वच्छ धुवा.

बाहेर जाणं टाळा. घरीच थांबा.

फोन किंवा ऑनलाईन माध्यमातून तुमच्या डाक्टरांच्या संपर्कात राहा.

करोना व्हायरसची लागण झाल्यास…

जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर कोणत्याही निरोगी व्यक्तीप्रमाणे तुम्हाला कोणताही गंभीर आजार होणार नाही. तुम्ही स्वत:ला क्वारंटाइन- विलग करा आणि लक्षणं अधिक गंभीर होताहेत का, यावर लक्ष ठेवा. जर गंभीर लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला तत्काळ वैद्यकीय काळजीची गरज आहे.

एक लक्षात घ्या की, कोरोना व्हायरस हा एक नवीन विषाणू आहे. त्यामुळे त्याच्याविषयीची पुरेशी माहिती आपल्याला अद्याप नाही. कोरोनामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते किंवा गर्भधारणेत अडथळा निर्माण होतो, याविषयी आपल्याकडे कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. कोरोनाशी संबंधित वैद्यकीय उपचार हे इतर कोणत्याही विषाणूजन्य संक्रमणासाठी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांसारखेच आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या महिलेकडून तिच्या (पोटातील किंवा प्रसूतीनंतर) बाळाला हा विषाणू संक्रमित होऊ शकतो असा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही.

आता तुम्ही काय करायला हवं?

खबदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगबाबत सरकार देत असलेल्या सल्ल्यांचं तुम्ही पालन करायला हवं. सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा आणि कोरोना व्हायरसची लागण झाल्याची संभाव्य लक्षणं दिसणाऱ्यांपासून कटाक्षाने दूर रहा.

जर गर्भधारणा होऊन तुम्हाला 28 आठवड्यांहून अधिक काळ लोटला असेल तर तुम्ही सोशल डिस्टन्सिंगबाबत विशेष खबरदारी घ्यायला हवी.

जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला ताप आला किंवा नव्याने, सततचा खोकला सुरु झाला तर तुम्ही सात दिवस घरातच रहायला हवं आणि जर सात दिवसांतही तुमची स्थिती सुधारली नाही, तुमचा आजार वाढतच गेला किंवा घरात राहून या स्थितीवर मात करता येणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर पुढील उपचारांसाठी तुम्ही रुग्णालयात दाखल करुन घ्यायला हवं. सर्वसाधारण सूचना-

  • सर्व प्रकारची खबरदारी घ्या.
  • शांत रहा आणि सकारात्मक विचार करा.
  • जीवनसत्वांनी परिपूर्ण असा आरोग्यदायी आहार घ्या.
  • सक्रीय रहा. थोडासा व्यायाम करा.
  • पुरेशी झोप घ्या.
  • ताण आणि चिंता दूर करण्यासाठी ध्यानधारणा करा.

टीप – (डाॅ. स्नेहल अडसुळे या न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन असून ‘वूमन मेटाबोलिझम डाएट’ यातील तज्ज्ञ आहेत. वरील सर्व तपशील/टिप्स त्यांनी दिलेल्या आहेत. ही टीव्ही 9 ची निर्मिती नाही

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.