8 महिन्यांची गर्भवती, पतीसोबत अन्न-पाण्याविना 100 किमीपर्यंत पायपीट

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं (Pregnant women walked hundred km during lockdown)  आहे.

8 महिन्यांची गर्भवती, पतीसोबत अन्न-पाण्याविना 100 किमीपर्यंत पायपीट
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 4:39 PM

लखनऊ  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं (Pregnant women walked hundred km during lockdown)  आहे. त्यामुळे मजूर आणि असंघटित कामगारांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सर्व मजूर भीतीने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने सर्व मजूर पायी चालत जात आहेत. यामध्येच एका मजुराच्या आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला मेरठमध्ये रेस्क्यू करण्यात आलं आहे. हे दोघे सहारनपूरपासून बुलंदशहरापर्यंत 100 किमी अंतर (Pregnant women walked hundred km during lockdown) चालत आले.

मेरठपर्यंत अन्न-पाण्याविना 100 किमी पायी चालल्याने दोघेही थकले होते. मेरठच्या साहेबराव गेटवर स्थानिक नवीन कुमार आणि रविंद्र यांनी पाहिले आणि त्यांनी तातडीने नौचंदी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रेमपाल सिंह यांना माहिती दिली.

“पोलिसांना माहिती मिळताच पोलील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या दाम्पत्याला स्थानिकांनी आणि प्रेमपाल सिंह यांनी जेवण आणि काही पैसे दिले. त्यासोबत त्यांना एक अॅम्बुलन्सची व्यवस्था करुन दिली. यामधून ते बुलंदशहरमधील अमरगड यांच्या गावी पोहोचले”, असं पोलीस अधिकारी आशुतोष कुमार यांनी सांगितले.

“या गरोदर मिहलेचा पती एका कारखान्यात काम करत होता आणि दोन दिवसांपासून त्याने आपल्या पत्नीसोबत 100 किमी चालत प्रवास केला”, असंही आशुतोष कुमार यांनी सांगितले.

“कारखान्याच्या मालकाने आम्हाला राहण्यासाठी एक रुम दिली होती. पण लॉकडाऊनच्या घोषणेनंतर त्याने आम्हाला रुम खाली करण्यास सांगितले. तसेच त्याने पैसे न देता आम्हाला गावी पाठवले”, असं गरोदर महिलेने सांगितले.

“घरातून बाहेर काढल्यानंतर पुढे काही मार्ग दिसत नसल्याने आम्ही चालत गावी येण्यासाठी निघालो. रस्त्याने चालत येताना आमच्याकडे जेवणही नव्हते. सर्व हॉटेल, दुकानं बंद होती त्यामुळे आम्हाला उपाशी राहावे लागले”, असंही गरदोर महिलेने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे मजदूर आणि कारखान्यातील कामगारांमध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे ते पायी चालत आपल्या गावी जाण्यास निघाले. तसेच मोदींनी ही लॉकडाऊनची घोषणा करत जनतेची माफी मागितली आणि या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याल हा निर्णय घ्यावा लागला, असंही मोदींनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.