इस्रोच्या कामगिरीवर देशाला अभिमान : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामाचं कौतुक केलं (Republic Day 2020).

इस्रोच्या कामगिरीवर देशाला अभिमान : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
Follow us
| Updated on: Jan 26, 2020 | 8:23 AM

नवी दिल्ली : देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामाचं कौतुक केलं (Republic Day 2020). “भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे. इस्रोची टीम सध्या ‘मिशन गगनयान’ची पूर्ण तयारी करत आहे. तसेच, संपूर्ण देश ‘भारतीय मानव अवकाश यान कार्यक्रमाची प्रतिक्षा करत आहे”, असं रामनाथ कोविंद म्हणाले (President Ramnath Kovind).

“देशाच्या विकासासाठी एक सशक्त अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारने देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणखी मजबूत बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत (President Ramnath Kovind).”

“देशातील सेना, निमलष्करी दलं आणि अंतर्गत सुरक्षा दल यांची मी स्तुती करतो. देशातील एकता, अखंडता आणि सुरक्षेला अबाधित ठेवण्यासाठी त्यांचं बलिदान शौर्य आणि शिस्तीची अमर कथा सांगणारे आहे. आपले शेतकरी, डॉक्टर्स आणि परिचारिका, शिक्षण आणि संस्कार देणारे शिक्षक, वैज्ञानिक आणि इंजिनिअर्स, सतर्क आणि सक्रिय तरुण, अथक परिश्रम करुन आपले कारखाने चालवणारे आपले कामगार बांधव देशाचे गौरव आहेत.”

“कुठल्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना विशेषकरुन तरुणांना गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा कधी विसर पडू नये. गांधीजींचा अहिंसेचा मार्ग हा मानवतेसाठी अमूल्य भेट आहे.”, असं राष्ट्रपती म्हणाले.

“प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात विदेशी राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याची आपली परंपरा आहे. मला आनंद आहे की यावर्षीही रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

“आजपासून सात दशतकांपूर्वी 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झालं. त्यापूर्वीच या तारखेचं विशेष महत्त्व प्रस्थापित झालं होतं. ‘पूर्ण स्वराज्य’चा संकल्प घेतल्यानंतर देशवासी 1930 ते 1947 पर्यंत प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला ‘पूर्ण स्वराज्य दिन’ साजरा केला जायचा. त्यामुळे 1950 पासून त्याच ऐतिहासिक दिवशी भारताच्या लोकांनी संविधानप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात केली”, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नमुद केलं.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...