इम्रान खान यांनी मदतीसाठी फोन केला, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘तुमचं तुम्ही पाहून घ्या’

ट्रम्प (Donald Trump) यांनी हा मुद्दा तुम्हीच चर्चा करुन सोडवा, असा सल्ला दिला. यूएनएससीच्या बैठकीत भारताविरोधात आवाज उठवण्याचा पाकिस्तान (Imran Khan) आणि चीनचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

इम्रान खान यांनी मदतीसाठी फोन केला, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'तुमचं तुम्ही पाहून घ्या'
Follow us
| Updated on: Aug 16, 2019 | 11:57 PM

न्यूयॉर्क : काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची (UNSC) बैठक (UNSC Meeting on Kashmir) पार पडली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत (UNSC Meeting on Kashmir) चीनने पाकिस्तानची बाजू घेतली, तर रशियाने द्वीपक्षीय चर्चेचं समर्थन केलं. भारताने जम्मू काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाने सद्यपरिस्थिती बदलली आहे, ज्यामुळे काश्मीरमध्ये नाजूक परिस्थिती असून यूएनएससी सदस्य मानवाधिकारांबाबत चिंतेत आहेत, असं चीनच्या प्रतिनिधीने बैठकीनंतर (UNSC Meeting on Kashmir) सांगितलं.

एकीकडे भारताने या बैठकीला फारसं गांभीर्याने घेतलं नाही, तर पाकिस्तानला मोठी अपेक्षा होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी मदत मागण्यासाठी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना फोन केला. पण ट्रम्प (Donald Trump) यांनी हा मुद्दा तुम्हीच चर्चा करुन सोडवा, असा सल्ला दिला. यूएनएससीच्या बैठकीत भारताविरोधात आवाज उठवण्याचा पाकिस्तान (Imran Khan) आणि चीनचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

एएफपीच्या वृत्तानुसार, काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करुन मार्ग काढावा, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना सांगितल्याचं व्हाईट हाऊसने सांगितलंय.

इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नी सद्यस्थितीची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्याचं पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. यूएनएससीमध्ये पाकिस्तानला अपेक्षित होतं तसं काहीही झालं नाही. कारण, अत्यंत अनौपचारिक पद्धतीने बैठक झाली, ज्यात चीन आणि पाकिस्तानची मागणी अमान्य झाली.

संबंधित बातम्या :

UNSC बैठकीत चीनला पाकिस्तानचा पुळका, रशिया भारतासाठी मैदानात

चीन विसरला – ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते’

UNSC : सय्यद अकबरुद्दीन पाक पत्रकाराच्या जवळ गेले, शिमला करार सांगितला

UNSC ची 48 वर्षांनी काश्मीर प्रश्नावर बैठक, ‘या’ कारणामुळे भारत निश्चिंत

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.