भंडारा रुग्णालय दुर्घटनेमधील पीडित कुटुंबांना मोदी सरकारची मोठी मदत
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या आगीत अतिदक्षता विभागात ठेवलेल्या 10 नवाजात बालकांचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (Prime minister help Bhandara hospital)
नवी दिल्ली : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या आगीत अतिदक्षता विभागात ठेवलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Centrral government) घेतला आहे. तसेच, या आगीत जी बालकं गंभीर जखमी झाली आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याचीही घोषणा केंद्राने केलीये. ही मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून करण्यात येईल. (Prime minister announced 2 lakh help for the families who lost their lives in Bhandara hospital fire)
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला आग लागली होती. यावेळी रुग्णालयात धूर जमा झाल्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवलेल्या तब्बल 10 बालकांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली गेली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित देशमुख यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सागितलं होतं. त्यांनतर आता केंद्र सरकारने या आगीत ज्या बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याचे केंद्राने जाहीर केले आहे. तसेच, या आगीत गंभीर जखमी झालेल्या बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to the tragic hospital fire in Bhandara, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) January 11, 2021
देवेंद्र फडणवीसांकडून आभार
पंतप्रधान कार्यालयाने ही मदत जाहीर करताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. पंतप्रधान कार्यालयाला उद्देशून भंडारा येथील दुर्घटनेत ज्या कुटुंबांना दु:खाला सामोरं जावं लागलं अशा कुटुंबांना आर्थिक मदत केल्याबद्दल आभारी आहोत, असं फडणवीसांनी म्हटलंय.
Thank you, Hon PM @narendramodi ji for the timely support to the families who suffered an extremely painful loss and tragedy in Bhandara, Maharashtra.#BhandaraHospitalfire https://t.co/AK3gk8ELGy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 11, 2021
राज्याकडून 5 लाखांची मदत
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. घडलेला प्रकार लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यानी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत केली जाईल असं सांगितलं होत. तसेच, या घटनेची कसून चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह
BREAKING | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली
भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह
(Prime minister announced 2 lakh help for the families who lost their lives in Bhandara hospital fire)