G20 summit | कोरोनाची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगावरील सर्वात मोठं संकट : पंतप्रधान नरेंद्र मोदी

| Updated on: Nov 22, 2020 | 7:10 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून सुरु झालेल्या जी-20 शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत.

G20 summit | कोरोनाची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगावरील सर्वात मोठं संकट : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

रियाध : जी-20 च्या दोन दिवसीय शिखर संमेलनाला (2020 G20 Riyadh summit) शनिवारपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या संमेलनात सहभागी झाले आहेत. जी-20 संमेनलाना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हा साथीचा रोग मानवी इतिहासातला मोठा टर्निंग पॉईंट आहे. हे जग दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. (Prime Minister Narendra Modi attended G-20 summit amid corona crisis)

या बैठकीनंतर पंतप्रधानांनी ट्वीट केलं आहे की, जी-20 नेत्यांशी खूप महत्त्वाची चर्चा झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निश्चितच आपण या महामारीमधून सावरू. या व्हर्च्युअल संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल सौदी अरबचे आभार.

दरम्यान सौदी अरबचे शाह सलमान यांनी शनिवारी जी-20 शिखर संमेलनाची सुरुवात केली आणि कोरोनाशी लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करुया, असे आवाहनही केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-20 शिखर संमेलनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान सहभागी होऊन ऑनलाईन माध्यमातून संमेलनाला संबोधित करतील. शाह सलमान म्हणाले की, कोरोनाच्या संकटाविरुद्ध आपण एकजूट होणे गरजेचे आहे. तसेच एकत्र येत आणि या संमेलनाच्या माध्यमातून आपण जगाला एक आशेचा किरण दाखवायला हवा.

या वर्षीच्या जी-20 संमेलनाचे अध्यक्षपद सौदी अरबकडे असल्याने शाह सलमान यांनी या व्हर्च्युअल शिखर संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेनलात अमेरिका, चीन, भारत, टर्की, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझीलसह अन्य देशांचे नेते सहभागी झाले आहेत. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या संमेलनाला संबोधित करु शकतात.

जगभरात 5 कोटी 84 लाख कोरोनाबाधितांची नोंद, भारतातील रुग्णांची संख्या 90 लाखांच्या पुढे

जगभरात आतापर्यंत 5 कोटी 84 लाख 75 हजार कोरोनाबधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 13 लाख 85 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत 1 कोटी 24 लाख 46 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर भारतात ही संख्या 90.9 लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात आतापर्यंत 1 लाख 33 हजार 263 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

देशात 4 लाख 50 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण

देशात काल रात्रीपर्यंत 4 लाख 50 हजारांहून अधिक सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात 85 लाख 20 हजार 39 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत देशात 13 कोटी 6 लाख 57 हजारांहून अधिक कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात 10 लाख 66 हजार 22 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदी-जो बायडन यांच्यात फोन पे चर्चा, भारत अमेरिका एकत्रितपणे जागतिक आव्हानांशी लढणार

BRICS: पंतप्रधान नरेंद्र मोदी- शी जिनपिंग आमने-सामने येणार, गलवानमधील झटापटीनंतर तणाव वाढला

(Prime Minister Narendra Modi attended G-20 summit amid corona crisis)