आई होण्यासाठी प्रियांका चोप्रा आतूर

सिनेमाचं प्रमोशन करताना प्रियांकाने खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टीही उघड केल्या, ज्यात तिने आपण आई होण्यासाठी आतूर असल्याचंही सांगितलं.

आई होण्यासाठी प्रियांका चोप्रा आतूर
Follow us
| Updated on: Oct 09, 2019 | 7:31 AM

मुंबई : द स्काय इज पिंक सिनेमाच्या रिलीजपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Mother) जोरदार प्रमोशन करत आहे. भारतातील प्रमोशनल इव्हेंट्स संपल्यानंतर ती (Priyanka Chopra Mother) अमेरिकेतही सिनेमाचं प्रमोशन करत आहे. सिनेमाचं प्रमोशन करताना प्रियांकाने खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टीही उघड केल्या, ज्यात तिने आपण आई होण्यासाठी आतूर असल्याचंही सांगितलं.

काही वृत्तांनुसार, पती निक जॉनससोबत कुटुंबाची सुरुवात करण्याबाबतच्या प्रश्नावर प्रियांका उत्तर देत होती. आता जास्त वेळ मी वाट पाहू शकत नाही, असं ती म्हणाली. देवाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात चांगले क्षण येतात आणि निकसह मी या क्षणांची वाट पाहत आहोत, असं प्रियांकाने सांगितलं.

दरम्यान, प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत लेडी बॉन्ड बनण्याचीही इच्छा व्यक्त केली. तिला प्रश्न विचारण्यात आला की, जर जेम्स बॉन्डमध्ये पुरुषाच्या जागी स्त्री बॉन्ड असेल तर या पात्रासाठी कोण योग्य असेल? या प्रश्नाचं उत्तर देताना तिने स्वतःचीच निवड केली.

प्रियांकाचा द स्काय इज पिंक हा सिनेमा 11 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. शोनाली बोस दिग्दर्शित हा सिनेमा एका प्रेम कथेवर आधारित आहे. प्रियांकाकडून या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. भारतात अनेक ठिकाणी प्रमोशन केल्यानंतर तिने आता अमेरिकेत प्रमोशन सुरु केलंय. पती निक जॉनसनेही तिला प्रमोशनमध्ये साथ दिली.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.