सोनभद्र हत्याकांड: विरोध झुगारुन प्रियांका गांधी पीडितांना भेटल्या, दुःख ऐकून अश्रू अनावर

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अखेर आज उत्तर प्रदेशमधील सोनभद्रच्या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडितांचं दुःख पाहून प्रियांका गांधींनाही अश्रू अनावर झाले. प्रियांका यांनी पीडित कुटुंबाला आधार देत न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.

सोनभद्र हत्याकांड: विरोध झुगारुन प्रियांका गांधी पीडितांना भेटल्या, दुःख ऐकून अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Jul 20, 2019 | 1:21 PM

लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अखेर आज उत्तर प्रदेशमधील सोनभद्रच्या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडितांचं दुःख पाहून प्रियांका गांधींनाही अश्रू अनावर झाले. प्रियांका यांनी पीडित कुटुंबाला आधार देत न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. काल (19 जुलै) उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना सोनभद्रला जात असताना मिर्झापूर येथेच अडवत ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रियांका गांधींनी चुनार गेस्ट हाऊस येथेच रात्रभर धरणे आंदोलन करत पीडितांची भेटल्याशिवाय जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पीडित कुटुंब प्रियांका गांधींना भेटण्यासाठी मिर्झापूरला आलं. मात्र, तेथेही त्यांना भेटण्यास पोलिसांनी विरोध केला.

सोनभद्र येथे कलम 144 लागू असल्याचे कारण सांगत पोलिसांनी प्रियांका गांधींना पीडित कुटुंबीयांना भेटण्यास विरोध केला होता. मात्र, प्रियांका यांच्या धरणे आंदोलनानंतर पोलिसांनी पीडितांना मिर्झापूर किंवा वाराणसी येथे भेटण्याची मुभा दिली. त्यामुळे आज पीडित कुटुंबीय स्वतः मिर्झापूर येथे येऊन प्रियांका गांधींना भेटले. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी त्यांना प्रियांका गांधींना भेटू दिले नाही. काही वेळाने केवळ 2 जणांनाच प्रियांका गांधींची भेट घेऊ दिली.

काँग्रेसने प्रियांका गांधींच्या या भेटीचा एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने म्हटले, “उत्तर प्रदेशमध्ये संवेदनांचा मृत्यू झाला आहे. अजय सिंह बिष्ट सरकार या नरसंहाराकडे दुर्लक्ष करुन असंवेदनशिलतेची कळस करत आहे. या दुःखामुळे पीडित कुटुंबाच्या डोळ्यातून निघालेल्या प्रत्येक अश्रुचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.”

दरम्यान, पीडित कुटुंबीय प्रियांका गांधीना भेटण्यासाठी मिर्झापूरला आल्यानंतर पोलिसांनी भेट घेण्यास विरोध केला. त्यावर संतापलेल्या प्रियांका गांधी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, “प्रशासनाला पीडित कुटुंबाची सुरक्षा करायला हवी. ज्यावेळी या कुटुंबावर हल्ला झाला तेव्हा पोलिसांनी त्यांची मदत करायला हवी होती. त्यावेळी त्यांनी काहीही केले नाही. आता ते मला भेटण्यासाठी इथपर्यंत आले आहेत, मात्र पोलीस त्यांना भेटू देत नाही. त्यामुळे प्रशासनाची मानसिकता माझ्या समजेपलिकडची आहे.”

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून फिल्मी राडा आणि गोळीबार झाला होता.  100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये समोरासमोर गोळीबार झाला होता. 30 ट्रॅक्टर भरुन आलेल्या 300 लोकांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर केलेल्या गोळीबारात तब्बल 10 जण ठार झाले होते. तर 24 पेक्षा अधिक जखमी आहेत.  सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात बुधवारी (17 जुलै) ही घटना घडली. गुजर आणि गोंड समाजात हा हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी 24 जणांना अटक केली आहे, तर 78 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.